अजित पवार म्हणाले, 'सच्चा सहकारी गमावला'; नगरसेवक जावेद शेख यांना वाहिली श्रद्धांजली

अजित पवार म्हणाले, 'सच्चा सहकारी गमावला'; नगरसेवक जावेद शेख यांना वाहिली श्रद्धांजली

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक जावेद शेख यांच्या निधनाने सामान्यांच्या प्रश्नासाठी तळमळीने काम करणारा धडाडीचा कार्यकर्ता, सच्चा सहकारी गमावल्याची भावना व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे, की पिंपरी-चिंचवड महापालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक जावेद शेख यांनी सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कायमच तळमळीने काम केले. त्यांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा धडाडीचा कार्यकर्ता व सच्चा सहकारी गमावला आहे. संघटनेसाठी धडाडीने काम करणाऱ्या या झुंझार सहकाऱ्याची उणीव कायमच जाणवेल. आकुर्डी गावठाण भागातून त्यांनी महापालिकेचे तीनवेळा प्रतिनिधित्व केले. सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सभागृहात कायम आवाज उठविला. सामाजिक क्षेत्रातील तसेच, महापालिकेच्या माध्यमातून त्यांनी केलेले कार्य कायम स्मरणात राहील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com