पिंपरी चिंचवड अतिरिक्त आयुक्तांमध्ये अधिकार, पदभार वाटप

Ulhas-Vikas-Ajit
Ulhas-Vikas-Ajit

पिंपरी - महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी (तीन) नगरसचिव उल्हास जगताप यांची नियुक्ती आयुक्त राजेश पाटील यांनी केली. या शिवाय, तीनही अतिरिक्त आयुक्तांच्या अधिकारांचे वाटप केले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिका सेवेत नविन आकृतिबंधानुसार अतिरिक्त आयुक्तांची तीन पदे मंजूर आहेत. त्यातील एक व दोन क्रमांकाचे पद शासकीय सेवेतून, तर तीन क्रमांकाचे पद महापालिका सेवेतील अधिकाऱ्यांमधून भरायचे आहे. सध्या शासकीय सेवेतून दोन क्रमांकाच्या पदावर अजित पवार कार्यरत आहेत. एक व तीन क्रमांकाची पदे रिक्त होती. एक क्रमांकाच्या पदावर विकास ढाकणे सोमवारी (ता. १५) रुजू झाले आहेत. 

तीन क्रमांकाच्या पदासाठी महापालिका सेवेतील उल्हास जगताप यांची नियुक्ती शुक्रवारी (ता. १९) करण्यात आली. शिवाय, तीनही अतिरिक्त आयुक्तांचे अधिकार व जबाबदाऱ्यांचे वाटप आयुक्तांनी केले. 

असे आहेत अधिकार
आयुक्त राजेश पाटील - अमृत, स्मार्ट सिटी, जेएनएनयूआरएम असे विशेष प्रकल्प

अतिरिक्त आयुक्त (एक) विकास ढाकणे - प्रशासन, नगररचना, स्थापत्य (मुख्यालय, उद्यान, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन, प्रकल्प), शिक्षण, अग्निशमन, उद्यान व वृक्षसंवर्धन, आरोग्य (स्वच्छता अभियान), मध्यवर्ती भांडार, क्रीडा व बांधकाम परवाना. 

अतिरिक्त आयुक्त (दोन) अजित पवार - वैद्यकीय, वायसीएम, विद्युत मुख्य कार्यालय (दूरसंचारसह), आपत्ती व्यवस्थापन, नागरवस्ती विकास योजना, गृहप्रकल्प, बीआरटीएस, निवडणूक, जनगणना, पशुवैद्यकीय, करसंकलन, आकाशचिन्ह व परवाना, अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन, भूमी व जिंदगी, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन, पाणीपुरवठा व जलनिस्सारण.

अतिरिक्त आयुक्त (तीन) उल्हास जगताप - सर्व क्षेत्रिय कार्यालये व त्या अंतर्गतचे सर्व विभाग (सार्वजनिक वाचनालय व सभागृह), कायदा, सभाशाखा, आयटीआय, कार्यशाळा, अभिलेख, सुरक्षा, माहिती व जनसंपर्क.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com