esakal | पिंपरी-चिंचवडमधील रुग्णवाहिकांचा शॉर्टकट ठरेल जीवघेणा
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवडमधील रुग्णवाहिकांचा शॉर्टकट ठरेल जीवघेणा

रुग्णवाहिकेचा 'शॉर्टकट' जीवघेणा ठरण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

पिंपरी-चिंचवडमधील रुग्णवाहिकांचा शॉर्टकट ठरेल जीवघेणा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर जम्बो कोविड सेंटरला रुग्णवाहिका आणि रुग्णांसाठी खास प्रवेशव्दार आहे. मात्र, पिंपरी, नेहरूनगर या दिशेने घ्यावे लागणारे वळण अधिक पुढे असल्याने रुग्णवाहिका चालक शॉर्टकटचा वापर करत विरुद्ध दिशेने येतात. रुग्ण घेऊन येणाऱ्या खासगी रिक्षाही हाच कित्ता गिरवत आहे. त्यामुळे कधीतरी रुग्णवाहिकेचा 'शॉर्टकट' जीवघेणा ठरण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सप्टेंबरपासून हे कोविड सेंटर सुरू केले आहे. याच्या परिसरात दहा-बारा रुग्णवाहिका थांबलेल्या आहेत. सेंटरमध्ये प्रवेश करण्यासाठी उजव्या बाजूला मध्यभागी त्यांच्यासाठी खास सोय केली आहे. परंतु रूग्णांना दाखल करण्यासाठी आल्यावर सेंटरच्या मोठ्या गेटमधून बाहेर पडताना विरुद्ध दिशेचा वापर केला जातो. हा प्रकार महिनाभरापासून सुरू आहे. हे गेट तयार करताना पुरेसा विचार केलेला नाही. 

हेही वाचा- हॉटेल, रेस्टॉरंट सुरू; मात्र संकष्टीमुळे मांसाहार करणाऱ्यांचा हिरमोड

हेही वाचा- पिंपरी-चिंचवड : सरकारी कार्यालयांत नागरिकांचं बेजबाबदार वागणं ठरणार धोकादायक

रूग्णवाहिकेला सेंटरमध्ये जाण्यासाठी अर्धा किलोमीटर पुढे वळण आहे. मात्र, ते टाळण्यासाठी विरूद्ध दिशेचा वापर करतात. त्याचवेळी भोसरी, गवळीमाथा चौकाकडून येणारी मोठी वाहने भरधाव असतात. मोठा अपघात होण्याची शक्‍यता आहे. रात्री हा शॉर्टकट जीवघेणा ठरू शकतो. काही रिक्षाचालकदेखील शॉर्टकटचा अवलंब करतात. सध्या तात्पुरत्या कालावधीसाठी दुभाजक तोडून प्रवेशव्दारा समोरून रुग्णवाहिकेला प्रवेश देण्यासाठी सोय करावी, अशी नागरिक व वाहनचालकांची मागणी आहे.