इंग्लंडहून पिंपरी-चिंचवड शहरात आलेला आणखी एक प्रवासी पॉझिटीव्ह 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 30 December 2020

पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी 121 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 96 हजार 316 झाली आहे. आज 156 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 93 हजार 107 झाली आहे. सध्या एक हजार 457 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील एक व शहराबाहेरी दोन अशा तीन व्यक्तींचा मृत्यू झाला. दरम्यान, इंग्लंडहून आलेला आणखी एक प्रवासी पॉझिटीव्ह आढळला असून एकूण संख्या दोन झाली आहे.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी 121 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 96 हजार 316 झाली आहे. आज 156 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 93 हजार 107 झाली आहे. सध्या एक हजार 457 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील एक व शहराबाहेरी दोन अशा तीन व्यक्तींचा मृत्यू झाला. दरम्यान, इंग्लंडहून आलेला आणखी एक प्रवासी पॉझिटीव्ह आढळला असून एकूण संख्या दोन झाली आहे. 

आजपर्यंत मृत्यू झालेल्या शहरातील रुग्णांची संख्या एक हजार 752 झाली आहे. तर, शहराबाहेरील 722 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज मृत्यू झालेली शहरातील महिला सांगवी (वय 70) येथील रहिवासी आहेत. आज मृत्यू झालेले शहराबाहेरील पुरुष मावळ (वय 55) व महिला खेड (वय 70) येथील रहिवासी आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इंग्लंडहून आलेले व मुंबई विमानतळावर उतरलेल्या शहरातील 215 प्रशावाशांचा शोध घेण्यात आला आहे. कालपर्यंत ही संख्या 115 होती. 215 पैकी 167 प्रवाशांची तपासणी केली असून 112 जण नकारात्मक आले आहेत. दोन जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. 53 जणांचा तपासणी अहवाल प्रतीक्षेत आहे. 

दुकानदार आणि जागरूक नागरिकांनी आपल्या परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे बसवावेत

सध्या महापालिका रुग्णालयांत 644 रुग्ण उपचार घेत आहेत. 813 रुग्ण होम आयसोलेट आहेत. कंटेन्मेंट झोनमधील एक हजार 409 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट देऊन पाहणी केली. त्यात चार हजार 774 जणांची तपासणी करण्यात आली. आज 708 जणांचे विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत 85 हजार 709 जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे. 

पिंपरी-चिंचवड : शिक्षकांना मिळेना कोरोना प्रोत्साहन भत्ता 

आज एक हजार 790 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एक हजार 401 जणांचा तपासणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. आज रुग्णालयातून एक हजार 823 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एक हजार 110 जणांचा तपासणी अहवाल प्रतीक्षेत आहेत. 

आजपर्यंत पाच लाख 45 हजार 577 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील चार लाख 48 हजार 151 जणांचा तपासणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. आजपर्यंत पाच लाख 41 हजार 917 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another passenger from England came Pimpri Chinchwad positive