इंग्लंडहून पिंपरी-चिंचवडमध्ये आलेला आणखी एक जण पॉझिटिव्ह 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 1 January 2021

पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी 120 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 96 हजार 728 झाली आहे. आज 110 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 93 हजार 475 झाली आहे. सध्या एक हजार 497 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. शहराबाहेरील आज कोणाचाही मृत्यू झाला नाही, ही दिलासादायक बाब ठरली. दरम्यान, इंग्लंडहून आलेल्या आणखी एका प्रवाशाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे त्यांची एकूण रुग्णसंख्या सात झाली आहे.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी 120 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 96 हजार 728 झाली आहे. आज 110 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 93 हजार 475 झाली आहे. सध्या एक हजार 497 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. शहराबाहेरील आज कोणाचाही मृत्यू झाला नाही, ही दिलासादायक बाब ठरली. दरम्यान, इंग्लंडहून आलेल्या आणखी एका प्रवाशाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे त्यांची एकूण रुग्णसंख्या सात झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आजपर्यंत मृत्यू झालेल्या शहरातील रुग्णांची संख्या एक हजार 757 झाली आहे. तर, शहराबाहेरील 731 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज मृत्यू झालेले शहरातील पुरुष चिंचवड (वय 58) येथील रहिवासी आहेत. 

चिंचवडमध्ये टोळक्‍याचा राडा; कोयते भिरकावत वाहनांची तोडफोड 

इंग्लंडहून आलेले व मुंबई विमानतळावर उतरलेल्या शहरातील 268 प्रवाशांचा शोध घेण्यात आला आहे. त्यापैकी 188 प्रवाशांची तपासणी केली असून 173 जणांचा तपासणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. आज एका जणाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे एकूण सात जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. 50 प्रवाशी बाहेरगावी गेले आहेत. आठ जणांचा तपासणी अहवाल प्रतीक्षेत आहे. 16 प्रवाशांचा 28 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. 

हिंजवडीजवळ तरुणाचा खून; मित्रांनी मृतदेह फेकला मोकळ्या मैदानात 

सध्या महापालिका रुग्णालयांत 579 रुग्ण उपचार घेत आहेत. 918 रुग्ण होम आयसोलेट आहेत. कंटेन्मेंट झोनमधील 743 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट देऊन पाहणी केली. त्यात दोन हजार 401 जणांची तपासणी करण्यात आली. आज 730 जणांचे विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत 87 हजार 825 जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

आज दोन हजार 86 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एक हजार 822 जणांचा तपासणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. आज रुग्णालयातून दोन हजार 75 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एक हजार 655 जणांचा तपासणी अहवाल प्रतीक्षेत आहेत. 

आजपर्यंत पाच लाख 51 हजार 847 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील चार लाख 53 हजार 464 जणांचा तपासणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. आजपर्यंत पाच लाख 48 हजार 133 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another positive from England came Pimpri Chinchwad