Video : लंडन ते लाल परीचा प्रवास... नकोरे बाबा!... 

lind.
lind.
Updated on

लोणावळा : लाॅकडाऊन दरम्यान लंडनमध्ये अडकलेल्या नागरिकांना भारतात परत आणण्यासाठी सरकारच्या वतीने सध्या वंदे भारत अभियान राबविले जात आहे. परदेशात अडकलेले भारतीच सध्या मायदेशी परतत आहेत. मुळचे पुण्याचे असलेले अठरा नागरिक बुधवारी पहाटे लंडनहून मुंबई विमानतळावर दाखल झाले. मात्र भारतात परतलेल्या या नागरिकांना वेगळ्याच अनुभवाचा सामना करावा लागला. विमानतळावर दाखल झाल्यानंतर सर्व नागरिकांची तपासणी, मुंबई-पुणे प्रवासासाठी करण्यात आलेल्या बसची सोय, प्रवास भाड्यासाठी करण्यात आलेली अडवणूक, प्रवासादरम्यान बंद पडलेली बस त्यामुळे सर्व नागरिकांना झालेला मनस्ताप या सर्व कारणांमूळे कोरोनाचा संसर्ग राहीला बाजूला पण त्या प्रवाशांची वाऱ्यावरची वरातच निघाल्याचा अनूभव आला. प्रवाशांनी प्रवासादरम्यान सहन करावा लागलेल्या अडचणींचा पाढाच वाचला. 

मुळचे पुण्याचे असलेले अठरा नागरिक बुधवारी पहाटे लंडनहून मुंबई विमानतळावर दाखल झाले. प्रशासनाच्या वतीने सर्वांना पुण्यात क्वारंटाईन करण्यात येईल असे सांगत त्यांच्यासाठी एसटी बसची सोय करण्यात आली असल्याची माहीती देण्यात आली. परतलेल्या पुण्यातील प्रवाशांमध्ये दीड वर्षाच्या चिमुरड्यासह, चार जेष्ठ नागरिक, तरुण-तरुणींचा समावेश होता. लंडनहून परतलेले अभियंता अजिंक्य सावर्डेकर म्हणाले, बसचालकाने प्रत्येकी ९२० रुपये भाडे आकारण्यात येईल असे सांगत त्याशिवाय बस सोडता येणार नाही अशी माहीती प्रवाशांना दिली. मात्र परदेशातून आल्याने काहींकडे पैसे नसल्याने अडचण व्यक्त केली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बसचालक ऐकत नसल्याने प्रवाशांनी ऐकमेकांच्या सहकार्याने तडजोड करत पैशांची सोय केली. त्यानंतर प्रवाशांच्या साठी  एसटी महामंडळाच्या लाल परीची सोय करण्यात आली. प्रवास भाडे आकारण्यापासून सुरु झालेला मनस्ताप पुढेही कायम राहीला. खोपोली हद्दीत बोरघाटात घाट चढत असताना एसटी बसच्या इंजिनमधून अचानक धूर निघू लागल्याने प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. एसटी बस नादूरुस्त झाल्याने रखरखत्या उन्हात प्रवाशांना अन्न-पाण्याविना ताटकळत उभे राहावे लागले. अखेर अनेक फोनाफोनीनंतर मावळचे प्रांताधिकारी संदेश शिर्के, बोरघाट पोलिस मदत केंद्राचे निरीक्षक सुदाम पाचोरकर यांनी यासर्व प्रवाशांना खाण्या-पिण्याची सोय केली. शिर्के यांनी प्रवाशांना पुण्यात नेण्यासाठी पर्यायी बसची सोय करत दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास बस रवाना केली. मात्र यासाठी तीन तास अडकून पडावे लागल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. 

मदतीच्या नावाखाली अडवणूक- मदत कमी पण अडवणूकच फार झाली अशी प्रतिक्रीया लंडनहून परतलेले प्रवाशी अजिंक्य सावर्डेकर यांनी दिली. प्रवासादरम्यान जेष्ठ नागरिक, लहान मुलांचा समावेश होता. शासनाच्या वतीने अगोदर सर्व माहीती देणे गरजेचे होते. पुर्ण माहीती दिली जात नव्हती. मात्र भाड्यासाठी अडवणूक करत मनस्ताप सहन करावा लागला असे सावर्डेकर म्हणाले. असाच अनुभव राहील्यास आम्हाला आम्हाला आमच्या घरीच होम क्वारंटाईन करा अशी मागणी परतलेल्या सर्व नागरिकांच्या वतीने करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com