esakal | निराधार अफगाणी विद्यार्थ्यांना इंदिरा संस्थेकडून मायेचे पांघरूण
sakal

बोलून बातमी शोधा

Afghan Students

निराधार अफगाणी विद्यार्थ्यांना इंदिरा संस्थेकडून मायेचे पांघरूण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाकड - जोपर्यंत तालिबानी आहेत तोपर्यंत अफगाणिस्तानात जाणे शक्य होणार नाही. घरच्यांना संपर्क होणे कठीण झाले. पैशांची रसद पूर्णपणे थांबली. तेथील युद्धजन्य परिस्थितीची झळ आम्हाला भारतात बसत असून पुण्यातही जगणे कठीण झाले आहे... ही व्यथा अफगाणी रहिवासी व ताथवडे येथील इंदिरा महाविद्यालयात शिकणारी ताहेरा खवारी या विद्यार्थिनीची.

व्यवस्थापन विषयात पदवी घेणाऱ्या, मात्र सध्या अंधारात चाचपडणाऱ्या निराधार २५ अफगाणी विद्यार्थ्यांचे पालकत्व इंदिरा शिक्षण समुहाने स्विकारली आहे. त्यांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारीही घेत वसतीगृहात निवास व भोजन व्यवस्था केली आहे. या विद्यार्थ्यांनी तेथील भयाण परिस्थिती कथन करीत भावनांना वाट मोकळी करून दिली.

हेही वाचा: पिंपरी : नगरसेविकेचे संभाषण व्हायरल करणाऱ्या अभियंत्याला ताकीद

नंगरहारहुन (जलालाबाद) तीन वर्षांपूर्वी पुण्यात आलेला चमन गुल हा बीबीए परीक्षेत ७३ टक्के गुण मिळवत उत्तीर्ण झाला. मात्र, आता त्याच्या पुढील शिक्षणाची वाट बिकट झाली आहे. एकीकडे घरून मदत बंद झाली आणि दुसरीकडे वेळ संपल्याने भारत शासनाची शिष्यवृत्तीही बंद झाल्याने त्याला सर्वत्र अंधार दिसत होता. अफगाणी पोलीस दलात कर्तव्य बजावणाऱ्या त्याच्या दोन चुलत भावांना तालिबान्यांनी २०१३ ला ठार केले आहे. याचाही राग त्याच्या मनात असून चमनने स्वतःला व घरच्यांना वाचविण्यासाठी शिक्षण सोडून बंदूक हाती घेण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत तो म्हणाला, ‘‘इंदिरा संस्थेने मला शिक्षणाची जाणीव करून देत मन परिवर्तन केले आणि पुन्हा आमच्या हातात लेखणी देत शिक्षणाचे द्वार खुले केले.’’

पुण्यात शिकणारे अफगाण विद्यार्थी

२०१८-१९ - १८३

२०१९-२० - १५४

२०२०-२१ - २१७

२०२१-२२ - ५९८

हेही वाचा: पिंपरी : तरुणावर वार करीत दुकानाची तोडफोड

पुणे हे विद्येचे आणि माणुसकीचे माहेरघर

काहीजण लॉकडाऊनमुळे मायदेशी गेली असून ऑनलाईन शिकत आहेत. काही विद्यार्थी पुण्यातच अडकले आहेत. यातील बहुतांश जणांची आर्थिक स्थिती बरी असून उर्वरित अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीवर अवलंबून आहेत. मात्र, घरची मदत पूर्ण बंद झाल्याने आम्हा सर्वांसमोर जणू आभाळ कोसळले आहे. अशात पुणेकर आपल्याला परीने माणुसकी दाखवीत काळजी घेत आहे, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

भारतीय सरकारच्या सांस्कृतिक संबंध परिषदेच्या वतीने या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळते. त्या आधारे दरवर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विभागामार्फत शेकडो विद्यार्थी आपल्याकडे अर्ज करतात व शिक्षण घेतात मात्र, काहींचे शैक्षणिक वर्षे पूर्ण झाल्याने त्यांची शिष्यवृत्ती देखील बंद झाली आहे.

- डॉ. विजय खरे, संचालक, आंतरराष्ट्रीय विभाग, सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठ)

इंदिरा शिक्षण समुहात शिकणाऱ्या प्रत्येक अफगाण विद्यार्थ्यांने पाहिलेले उज्वल भविष्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही, एक माणूस म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. या कठीण काळात अफगाण विद्यार्थ्यांना सर्व पातळीवर प्राधान्याने सहकार्य केले जाईल.

- डॉ. तरिता शंकर, संस्थापिका, अध्यक्षा, इंदिरा शिक्षण समुह

loading image
go to top