भोसरीतील स्फोटाचा तपास सुरू, पण इंजिनियर पसार!

अविनाश म्हाकवेकर
Thursday, 17 September 2020

‘घटनेच्या आदल्या दिवशी ज्युनिअर इंजिनिअर सुनील रोटे या ठिकाणी आले होते. या ट्रान्सफॉर्मरविषयी आम्ही नवरा-बायको त्यांच्याकडे तक्रारी करत होतो. आमच्या जिवाला काही बरे-वाईट झाले तर याला जबाबदार कोण, असा आमचा प्रश्‍न होता. मात्र, त्यांनी आमच्याविरुद्ध भोसरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. सरकारी कामात अडथळा आणला. त्या रात्री साडेदहाला पोलिसांनी आम्हा नवरा-बायकोला तिकडे बोलावून घेतले.

पिंपरी - ‘घटनेच्या आदल्या दिवशी ज्युनिअर इंजिनिअर सुनील रोटे या ठिकाणी आले होते. या ट्रान्सफॉर्मरविषयी आम्ही नवरा-बायको त्यांच्याकडे तक्रारी करत होतो. आमच्या जिवाला काही बरे-वाईट झाले तर याला जबाबदार कोण, असा आमचा प्रश्‍न होता. मात्र, त्यांनी आमच्याविरुद्ध भोसरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. सरकारी कामात अडथळा आणला. त्या रात्री साडेदहाला पोलिसांनी आम्हा नवरा-बायकोला तिकडे बोलावून घेतले. तिथे गुन्हेगारासारखी वागणूक मिळाली. मध्यरात्री बाराला आम्ही घरी आलो आणि नंतरच्या बारा तासांत माझ्या बायकोचा मृत्यू झाला. महावितरणच्या अधिकाऱ्याने माझ्या बायकोसह तिघांचा खूनच केला आहे,’’ असा आरोप दिलीप कोतवाल यांनी केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्फोटात शारदा यांच्यासह विवाहित मुलगी हर्षदा काकडे, चार महिन्यांची नात शरण्या यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत भोसरी पोलिस ठाण्यात सुनील कल्याण रोटे (वय ३०, रा. स्पाइन रस्ता) व आणखी एकजण (नावाची नोंद नाही) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. निष्काळजीपणे मृत्यू घडविणे (३०४ अ)असे कलम त्यांना लावले आहे. ‘‘रोटे पसार झाला आहे. त्याला दोन वेळा पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो निसटण्यात यशस्वी झाला. येत्या दोन दिवसांत त्याला अटक केली जाईल,’’अशी माहिती भोसरीचे पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र गिरनार यांनी दिली.

मावळात काल दिवसभरात १२३ पॉझिटिव्ह; तळेगावने ओलांडला हजाराचा टप्पा

नेमकी घटना काय?
कोतवालांच्या घरालगत ट्रान्सफॉर्मरची जागा आहे. येथील लोकांना लहान स्फोटांची सवय आहे. लोक तक्रारी करून थकले; पण महावितरणला जाग आली नाही. मूळचा ट्रान्सफॉर्मर जळाला. म्हणून दुसरा बसवला. मात्र, पाच सप्टेंबरला त्यामधूनही जाळ निघाला. परिसरातील वीज गेली. रात्री साडेबाराला तिसरा ट्रान्सफॉर्मर बदलला. पहाटे पाचला वीजप्रवाह तात्पुरता सुरळीत केला. दुसऱ्या दिवशी रविवारी हाही ट्रान्सफॉर्मर फुटून घटना घडली.

खासगी रुग्णालयांतील खर्च सरकारने द्यावा; आमदार जगताप यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

घरात ऑइलचा फवारा व धुराचे लोट
कोतवाल यांच्या वरच्या मजल्यावर मिनीनाथ कारंडे कुटुंबीय राहतात. त्यांच्या पत्नी अर्चना सांगतात, ‘‘तो भयावह प्रसंग होता. ट्रान्सफॉर्मरच्या दिशेलाच आमचे स्वयंपाकघर. जेवणे नुकतीच उरकली होती. सर्वजण आतल्या खोलीत गेलो आणि हा स्फोट झाला. आवाजापाठोपाठ ऑइलचा फवारा खोलीत आला. पाठोपाठ धुराचे लोटही शिरले. सगळे अंधारून आले. भूकंप झाला की इमारतीला आग लागली काहीच समजेना.’’

पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसांच्या फिटनेससाठी एच. ए. कंपनीने घेतला पुढाकार

‘मी रजेवर होतो’
या परिसराची जबाबदारी असलेले सहायक अभियंता उचेकर म्हणाले, ‘‘चार सप्टेंबरला आजीचे निधन झाल्याने मी रजेवर होतो, त्यामुळे मला घटनेविषयी काही सांगता येणार नाही.’’ ट्रान्सफॉर्मवरविषयी नागरिकांच्या अनेक तक्रारी होत्या त्यावर ते म्हणाले, ‘‘इंद्रायणीनगर स्थापन झाले त्यावेळी प्राधिकरणाने ती जागा निवडली आहे. पहिला ट्रान्सफॉर्मर ३१५ केव्हीए होता. त्याविषयी तक्रारी झाल्याने दुसरा २०० केव्हीएचा बसवला. कारण दुसरा उपलब्ध नव्हता.’’ इतर प्रश्‍नांबाबत त्यांनी जनसंपर्क विभागाकडे बोट दाखवले.

कनिष्ठ अभियंता रोटेचे सर्व मोबाईल बंद 
कुचेकर रजेवर असल्याने त्यांचा कार्यभार कनिष्ठ अभियंता सुनील रोटे याच्यावर होता. घटनेविषयी सतत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा ७८७५७६७४८० हा मोबाईल क्रमांक दिघी तक्रार निवारण केंद्राकडे वळवला आहे. या केंद्रातील चव्हाण म्हणाले, ‘‘रोटे यांचे वैयक्तिक मोबाईल क्रमांकही बंद आहेत. ते गेल्या दहा दिवसांपासून कामावर आलेले नाहीत. आम्ही त्यांच्याशी सतत संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे.’’

इलेक्‍ट्रिकल निरीक्षक उपलब्ध होईना
महावितरणशी संबंधित असे प्रकार घडतात, तेव्हा राज्य सरकारचे स्वतंत्र एक पथक नियुक्त केले जाते. घटना नेमकी कशी घडली, अधिकारी-कर्मचाऱ्याने कुचराई केली की तांत्रिक कारणांमुळे अपघात घडला, याचा शोध हे पथक घेते. या घटनेची तपासणी इलेक्‍ट्रिकल निरीक्षक थोरात करीत आहेत. त्यांच्याशी ९४०३७८०१२२ या क्रमांकावर संपर्क साधला. मात्र, त्यांनी कॉल स्वीकारले नाहीत. नंतर पुन्हा प्रयत्न केला असता तो आउट ऑफ कव्हरेज दाखवत राहिला.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhosari blast investigation underway but engineers fugitive