शहराध्यक्षपदाच्या राजीनाम्याबाबत भाजप आमदार महेश लांडगे यांचा खुलासा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 27 August 2020

  • आमदार महेश लांडगे यांचे राजीनामा नाट्य शमले 

पिंपरी : 'भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षपदाच्या राजीनाम्याबाबत अफवा पसरवली जात आहे. त्यावर विश्‍वास ठेवू नका,' अशी पोस्ट खुद्द शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनीच सोशल मीडियावर व्हायरली केली आणि बुधवारपासून रंगलेली त्यांच्या राजीनामा नाट्याची चर्चा गुरुवारी सकाळी शमली. मात्र, पक्षाचे माजी शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि लांडगे यांच्यातील मतभेदाचा विषय पुन्हा चर्चेत आला. 

पिंपरी-चिंचवड : यंदा गणेशोत्सवात हे महत्त्वाचे 'संस्कार' नागरिकांमध्ये रूजवले जातायेत

'डोळे शिणले, तरी न्याय मिळेना'; गरवारे नायलॉन कंपनीच्या कामगारांची व्यथा

महापालिकेची आगामी निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. सत्ताधारी भाजपमध्ये मात्र गटातटाचे राजकारण जोर धरत आहे. विशेष म्हणजे जगताप व लांडगे यांच्यात शह-काटशहाचे राजकारण वेळोवेळी दिसून आले आहे. यात अग्रभागी राहिले आहेत. देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गाचा सेवा रस्त्याची निर्मिती, वाकड-ताथवडे परिसरातील नवीन चार रस्त्यांची निर्मिती, पिंपळे सौदागरसह भूसंपादनाचा खासगी वाटाघाटीने मोबदला देण्याचे विषय. सभागृहात जेव्हा-जेव्हा हे विषय आले, त्यांना जगताप समर्थक नगरसेवकांनी विरोध केला, तर लांडगे समर्थकांनी विषय मंजूर करण्याचा आग्रह धरला. प्रसंगी शिवसेना व राष्ट्रवादीच्या मताशी काहींनी सहमती दर्शवली. गेल्या स्थायी समिती सभेत असेच चित्र दिसून आले. शिवाय बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत लांडगे समर्थक नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने दोन्ही आमदारांत मतभेद असल्याची व लांडगे यांच्या राजीनाम्याची चर्चा रंगली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पक्षीय बलाबल 

महापालिकेत 128 पैकी भाजपचे 77 नगरसेवक आहेत. शिवाय, पाचपैकी चार नगरसेवक भाजप समर्थक आहेत. राष्ट्रवादीचे 36 नगरसेवक होते. त्यापैकी गेल्या दोन महिन्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्यांची सदस्य संख्या 34 झाली आहे. शिवसेनेचे नऊ, मनसेचा एक नगरसेवक आहे. यात भाजपचा विचार केल्यास लांडगे व जगताप समर्थक नगरसेवकांची सख्या जवळपास समसमान आहे. तर निष्ठावंत नगरसेवक संख्या साधारणतः आठ आहे. दोन पदाधिकारी कधी भाजपची बाजू घेतात तर कधी विरोधी भूमिका मांडतात. 

'चिंचवड'मध्ये सर्जिकल स्ट्राईक 

आमदार जगताप व आमदार लांडगे यांच्यामुळे शहराची विभागणी दोन भागात झाल्याचे बोलले जात आहे. जगताप यांच्या मतदारसंघातील वाकड-ताथवडेतील विषय, एका खाजगी रुग्णालयातील डॉक्‍टर व परिचारिकांचा विषय लांडगे यांनी सोडविल्याचे बोलले जात आहे. एकप्रकारे हे सर्जिकल स्ट्राईकच होते. त्यावरूनही दोघांमध्ये मतभेद झाल्याचे बोलले जात आहे. 

बैठकीला हजेरी 

राजीनामा नाट्य बुधवारी रंगले. मात्र, गुरुवारी सकाळी आमदार महेश लांडगे भाजपच्या भोसरी-चऱ्हाली मंडल पदाधिकाऱ्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. आकुर्डी- काळभोरनगर येथील अलिशान हॉटेलमध्ये मंडलाध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना निवडपत्र प्रदान करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला होता. विशेष म्हणजे जगताप गटाचे व निष्ठावंत गटाचे पदाधिकारीही उपस्थित होते. यात महापौर उषा ढोरे, पक्षाचे सरचिटणीस अमोल थोरात, माजी नगरसेवक राजू दुर्गे, महिला मोर्चा प्रदेश कोषाध्यक्षा शैला मोळक, स्वीकृत नगरसेवक मोरेश्‍वर शेडगे यांचा समावेश होता. मात्र, आमदार लांडगे नेहमीपेक्षा शांत होते. या बाबत उपस्थित कार्यकर्त्यांतही कुजबूज झाली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP MLA Mahesh Landage's revelation regarding the resignation of the city president