रेशनिंग धान्याचा काळाबाजार करणारे रॅकेट उघड; आठ जणांवर कारवाई

रेशनिंगच्या धान्याचा काळा बाजार करणाऱ्या आठ जणांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने कारवाई केली.
Crime
Crime Sakal
Summary

रेशनिंगच्या धान्याचा काळा बाजार करणाऱ्या आठ जणांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने कारवाई केली.

पिंपरी-चिंचवड - रेशनिंगच्या (Ration) धान्याचा (Grains) काळा बाजार (Black Market) करणाऱ्या आठ जणांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या (Police) गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने कारवाई (Crime) केली. तिघांना अटक केली असून पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. थेरगाव येथे झालेल्या या कारवाईत एका ट्रकसह २८ लाख २९ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

चालक बाळासाहेब भास्कर जाधव (वय ३७, रा. मु. पो. एकलहरे , ता.आंबेगाव , पुणे ), क्लिनर कल्पेश दत्तात्रय कापडी (वय ३३, रा. मु. पो. पारगाव शिंगवे, ता. आंबेगाव, पुणे ), छोटेलाल राधेशाम गुप्ता (वय ५७, रा. परीस कॉलनी, तापकिरनगर, काळेवाडी ) यांना अटक केली आहे. तर सूरज (रा. आकुर्डीगाव ), राहुल बनसोडे (रा. निगडी ), आम्ले (रा. रुपीनगर, निगडी), केंद्रे (रा. यमुनानगर, निगडी ), मावळे (रा. नारायणगाव) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Crime
महापौर पदाचा कार्यकाळ संपला; गाडी जमा करुन उषा ढोरे दुचाकीवरून घरी

आरोपी जाधव , कापडी व गुप्ता यांनी शासकीय रेशनिंग दुकानातील तांदूळ व गहू चढ्या दराने आरोपी मावळे यास विकण्यासाठी जवळ बाळगला. तसेच आरोपी गुप्ता याने सूरज, बनोसाडे व केंद्रे यांच्याकडून रेशनिंगचे तांदूळ व गहू चढ्या दराने काळ्या बाजारात विक्रीसाठी विकत घेतल्याचे समोर आले. या आरोपींकडून ३५८ पोती गहू, ६०५ पोती तांदूळ, एक ट्रक व इतर मुद्देमाल असा एकूण २८ लाख २९ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी (ता. १२) पहाटे अडीचच्या सुमारास थेरगाव येथील ग्रीन मॅपल सोसायटीजवळ करण्यात आली. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात आरोपींवर अत्यावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल झाला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com