शरीरसौष्ठव स्पर्धा यंदा ऑनलाइन; स्पर्धेचं स्वरूप कसं असेल...वाचा सविस्तर

शरीरसौष्ठव स्पर्धा यंदा ऑनलाइन; स्पर्धेचं स्वरूप कसं असेल...वाचा सविस्तर

पिंपरी : शरीरसौष्ठवपटूंची वर्षभराची मेहनत वाया जाऊ नये म्हणून 'महाराष्ट्र श्री', 'भारत श्री' आणि 'आशिया श्री' शरीर सौष्ठव स्पर्धा यंदा प्रथमच ऑनलाइन होणार आहेत. येत्या जुलै महिन्यात या स्पर्धा भरविण्याचे नियोजन महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन, इंडियन बॉडी बिल्डिंग ऍन्ड फिटनेस फेडरेशन तसेच, एशियन फेडरेशन ऑफ बॉडी बिल्डिंग ऍन्ड फिटनेस या संघटनांकडून केले जात आहे. 

कोरोनाच्या प्रादुर्भावाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फटका क्रीडा क्षेत्रालाही बसला आहे. अनेक क्रीडा संघटनांचे वर्षभरातील स्पर्धांचे वेळापत्रक बिघडले आहे. काही संघटनांनी स्पर्धा नियोजित स्पर्धा रद्द केल्या आहेत. तर काही क्रीडा संघटनांचा ऑनलाईन (डिजिटल) पद्धतीने स्पर्धा भरविण्याकडे कल दिसून येत आहे. महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन, इंडियन बॉडी बिल्डिंग ऍन्ड फिटनेस फेडरेशन (आयबीबीएफएफ) ही त्याला अपवाद राहिलेली नाही. हार्डकोअर जिम बंद असल्याने अनेक खेळाडू घरी राहूनच व्यायाम करत आहेत. त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून हा निर्णय संघटनांनी घेतला आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

'आयबीबीएफएफ'चे सरचिटणीस डॉ. संजय मोरे म्हणाले, "कोरोनामुळे शरीरसौष्ठवपटूंचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून आम्ही प्रथमच 'महाराष्ट्र श्री', 'भारत श्री' आणि 'आशिया श्री' या महत्वाच्या स्पर्धा डिजिटल म्हणजेच ऑनलाइन स्वरुपात भरविणार आहोत. एकाच वेळेस साधारणतः 5 स्पर्धकांची कामगिरी पहाता येईल, असे विशिष्ट प्रकारचे सॉफ्टवेअर आम्ही डिझाईन करून घेतले आहे. त्यासाठी सुमारे साडेतीन लाख रुपयांचा खर्च आला आहे. सर्व स्पर्धक, पंच समिती आणि प्रेक्षकांना ही स्पर्धा यू-ट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्रामवरून लाईव्ह पहाता येईल. या स्पर्धांचे निकालही ऑनलाइन असतील. यशस्वी स्पर्धकांना त्यांच्या पारितोषिकांच्या रोख रक्कमा त्यांच्या खात्यात जमा केल्या जाणार आहेत. पदके, चषक कुरियरमार्फत पाठविले जाणार आहेत. तर प्रमाणपत्रे ई-मेलवर पाठविली जातील.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

जुने व्हिडिओ पाठविता येऊ नये म्हणून... 

स्पर्धकांना त्यांचे जुने व्हिडिओ पाठविता येऊ नये म्हणून संघटनेच्या वेबसाईटवर नवीन लिंक देण्यात येणार असून, तेथे जाऊनच स्पर्धकाला त्याचा व्हिडिओ अपलोड करावा लागणार आहे. 'महाराष्ट्र'श्री साठी साधारणतः 26 जूनपर्यंत व्हिडिओ मागविण्यात येणार आहे. या स्पर्धेत 25 जिल्ह्यांतील सुमारे 250 ते 300 स्पर्धक भाग घेतील. तर 'भारत श्री'साठी देशभरातील सुमारे 500 स्पर्धक स्पर्धेत उतरण्याची अपेक्षा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com