
गुरूवारी (ता.5) दुपारी तीनच्या सुमारास फिर्यादी व त्यांची पत्नी घरी असताना त्यांचा मुलगा आकाश यास "नशा करू नको' असे समजावून सांगण्यासाठी गेले. यावरून चिडलेल्या आकाशने आई-वडिलांना शिवीगाळ करीत चुलीजवळ पडलेला एक लाकडी गट्टू वडिलांच्या दिशेने फेकून मारला. यामध्ये त्यांना दुखापत झाली.
पिंपरी : "नशा करू नको' असे समजावून सांगणाऱ्या आई-वडिलांना मुलानेच शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना निगडीतील ओटास्किम येथे घडली.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
आकाश अनिल घोडके (वय 19, रा. सेक्टर क्रमांक 22, भिमक्रांतीनगर, ओटास्किम, निगडी) असे आरोपी मुलाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडील अनिल गफुल घोडके (वय 45) यांनी फिर्याद दिली आहे.
हृदयद्रावक : वडिलांनी शर्थीचे प्रयत्न करूनही मुलगा बुडाला
गुरूवारी (ता.5) दुपारी तीनच्या सुमारास फिर्यादी व त्यांची पत्नी घरी असताना त्यांचा मुलगा आकाश यास "नशा करू नको' असे समजावून सांगण्यासाठी गेले. यावरून चिडलेल्या आकाशने आई-वडिलांना शिवीगाळ करीत चुलीजवळ पडलेला एक लाकडी गट्टू वडिलांच्या दिशेने फेकून मारला. यामध्ये त्यांना दुखापत झाली. याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
महत्त्वाची बातमी: MBBS, BDSच्या जागा जाहीर; विद्यार्थ्यांमध्ये अॅडमिशनसाठी रंगणार चुरस