
पिंपरी : ते दांपत्य. कोणाच्या संपर्कात कसे? कुठे? केव्हा? आले माहित नाही. पण, त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांनी रुग्णालय गाठले. घशातील नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठवले. रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आणि दोघेही हादरले. ते राहात असलेल्या संभाजीनगर परिसरातही भितीचे सावट पसरले. या घटनेला 15 दिवस पूर्ण झालेत.
चौदा दिवसांच्या उपचारानंतर त्यांच्या घशातील नमुने तपासण्यात आले. रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यांना आनंद झाला. चोवीस तासांच्या अंतराने पुन्हा नमुने तपासले. तेही निगेटिव्ह आले आणि त्यांच्या डिस्चार्जची तयारी रुग्णालय प्रशासनाने सुरू केली. एका राजकीय पदाधिकाऱ्यामार्फत ही वार्ता संभाजीनगर परिसरात पोचली. राजकीय कार्यकर्त्यांसह परिसरातील नागरिकांनी त्यांच्या स्वागताची तयारी सुरू केली. इकडे त्यांना घेऊन रुग्णवाहिका रुग्णालयातून निघाली. याचा निरोपही परिसरात पोचला.
पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
ढोलताशे वाजू लागले. अवघ्या काही मिनिटांत रुग्णवाहिका त्यांच्या घराजवळ येऊन थांबली. संकटातून ते वाचले ही जमेची बाजूच आहे. परंतु, अतिउत्साही नागरिकांनी ढोल-ताशांचा गजर केला. सर्व नितीनियम पायदळी तुडवले. सोशल डिस्टन्सिंगचा नियमाचे उल्लंघन केले. जमावबंदी व संचारबंदीचा आदेशाचीही पायमल्ली झाली. याबाबत सजग नागरिकांनी मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली.
काय आहे नियम
सोशल डिस्टन्सिंग : सोशल डिस्टंसिंग म्हणजे दोन व्यक्तींमधील सामासिक अंतर. दोन व्यक्तींमध्ये किमान तीन ते चार फुट अंतर ठेवायला हवे. दांपत्याचे स्वागत करणाऱ्या नागरिकांनी मात्र, याकडे सरसकट दुर्लक्ष केल्याचे आढळले.
जमावबंदी : कोरोनाही राष्ट्रीय आपत्ती जाहीर झालेली आहे. या काळात पोलिस आयुक्तांचा जमावबंदी आदेश अर्थात भारतीय दंड संहिता कलम 144 लागू आहे. त्यानुसार पाच पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यास मनाई आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करीत शेकडो नागरिक जमा झाले होते.
संचारबंदी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिस आयुक्तांनी संचारबंदी आदेश अर्थात भारतीय दंड संहिता कलम 188 लागू केले आहे. यानुसार विनाकारण रस्त्यावर फिरण्यास मनाई आहे. तरीही शेकडोच्या संख्येने नागरिक रस्त्यावर आले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.