
मंजूर विकास योजनेतील शहरातील रस्ते व आरक्षणांनी बाधित क्षेत्राचा मोबदला संबंधित मिळकतधारकास खासगी वाटाघाटीने देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार रहाटणी, पिंपरी, चऱ्होली, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव व चिंचवड येथील रस्ते व आरक्षणे विकासाचा विषय मोकळा झाला आहे. त्यासाठीच्या 22 जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे.
पिंपरी - मंजूर विकास योजनेतील शहरातील रस्ते व आरक्षणांनी बाधित क्षेत्राचा मोबदला संबंधित मिळकतधारकास खासगी वाटाघाटीने देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार रहाटणी, पिंपरी, चऱ्होली, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव व चिंचवड येथील रस्ते व आरक्षणे विकासाचा विषय मोकळा झाला आहे. त्यासाठीच्या 22 जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका शहरात संचारबंदीची "एैशी-तैशी'
खासगी वाटाघाटीने भूसंपादन करताना संबंधित जमीन मालकास मोबदला किती द्यावा, यावरून सुमारे सात वर्षांपासून मतमतांतरे सुरू होती. महापालिका सभेपुढे यापूर्वी तीन वेळा हा विषय आला आहे. मात्र, वेगवेगळ्या वेळी घेतलेल्या वेगवेगळ्या निर्णयांमुळे पेच निर्माण झाला होता. राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्येही मतभेद होते. त्यामुळे हा विषय वेळोवेळी प्रलंबित राहिला आहे. अखेर खासगी वाटाघाटी समितीची ऑक्टोबर महिन्यात बैठक होऊन एकमत झाले आहे. त्यामुळे संबंधित जागा विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार मोबदला देऊन जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
तांत्रिक अडचणीमुळे विलंब
- महापालिकेतर्फे खासगी वाटाघाटीने भूसंपादन करताना संबंधित जमीन मालकास मोबदला देताना तीस टक्के दिलासा रक्कम देण्यास नोव्हेंबर 2013 च्या सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली होती.
- नोव्हेंबर 2015 मध्ये सर्वसाधारण सभेने नवीन ठराव केला. नवीन भूसंपादन कायदा 2013 मधील तरतुदींचा आधार घेण्यात आला. त्यानुसार, ज्या मिळकतधारकांचे क्षेत्र शून्य ते 300 चौरस मीटर आहे. त्यांना शंभर टक्के दिलासा रक्कम व 300 चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्राच्या भूखंडधारकांना 30 टक्के दिलासा रक्कम देण्यात मान्यता देण्यात आली.
- 20 नोव्हेंबर 2015 नंतर 300 चौरस मीटरपेक्षा मोठ्या भूखंडाचे विभाजन करून 300 चौरस मीटरपेक्षा कमी क्षेत्राचा भूखंड केलेल्या सर्व प्रकरणांत सांत्वना रक्कम 30 टक्के इतकीच देय राहील, असा प्रस्ताव जानेवारी 2020 च्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आला होता. त्यावरून पेच निर्माण झाला होता. तो आता सुटला आहे.
"मीच घरकुलचा डॉन आहे' म्हणत तेरा वाहनांची तोडफोड; तरूणावर प्राणघातक हल्ला
असे प्रयोजन- असे क्षेत्र
गाव/प्रयोजन/क्षेत्र (चौरस मीटर)
रहाटणी/18 मीटर रस्ता/1411.11
पिंपरी/12 मीटर रस्ता/77.27
चऱ्होली/18 मीटर रस्ता/722.60
पिंपरी वाघेरे/18 मीटर रस्ता/292
पिंपळे गुरव/18 मीटर रस्ता/607.75
चिंचवड/34.50 मीटर रस्ता/2530
पिंपळे सौदागर/खेळाचे मैदान/278
Edited By - Prashant Patil