धक्कादायक! पिंपरी-चिंचवडमध्ये एवढ्या आजी-माजी नगरसेवकांना कोरोना

धक्कादायक! पिंपरी-चिंचवडमध्ये एवढ्या आजी-माजी नगरसेवकांना कोरोना

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील आजी-माजी लोकप्रतिनिधींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यातील एक आमदार, एक माजी नगरसेविका, एक माजी नगरसेवक, एक विद्यमान नगरसेविका बरी होऊन घरी गेले आहेत. माजी विरोधी पक्षनेते व विद्यमान नगरसेकाचा शनिवारी मृत्यू झाला आहे. आज तीन नगरसेवकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. 

लोकप्रतिनिधींच्या घरात कोरोनाने शिरकाव केला आहे. एक-दोन नव्हे, तर सर्व कुटुंबालाच बाधा झाली आहे. यात चिंचवड विधानसभा मतदारसंघातील एका नगरसेविकेसह कुटुंबातील आठ जण आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघातील एका नगरसेवकाच्या कुटुंबातील सहा जण पॉझिटिव्ह आढळले होते. तसेच, याच नगरसेविकेच्या घराजवळ राहणाऱ्या माजी नगरसेविकेलाही बाधा झाली होती. हे सर्व जण आता बरे झाले आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरातील एक विद्यमान आमदारांसह कुटुंबातील पाच जणांना संसर्ग झाला होता. त्यांनाही आता डिस्चार्ज मिळाला आहे. मात्र, भोसरी विधानसभा मतदारसंघातील एका नगरसेवकाचा बळी गेला आहे. एक अभ्यासू नेतृत्व, खंबीर नेता असा त्यांचा लौकिक होता. आज तीन नगरसेवकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यातील दोन सत्ताधारी भाजपचे असून, एक नगरसेवक निगडीतील आहे. एका प्रादेशिक राजकीय पक्षाचे ते एकमेव सदस्य महापालिकेत आहेत.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com