इंदापूर तालुक्यात कोरोनाचा धाेका वाढतोय...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 15 July 2020

इंदापूर शहर व तालुक्यात दि. १५ जुलै रोजी १५ जण कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले असून, त्यामध्ये ७ पुरुष व ८ महिलांचा समावेश आहे.

इंदापूर : इंदापूर शहर व तालुक्यात दि. १५ जुलै रोजी १५ जण कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले असून, त्यामध्ये ७ पुरुष व ८ महिलांचा समावेश आहे.तालुक्यातील कोरोना बाधितरुग्णांची आजपर्यंतची एकूण संख्या ७५ झाली असल्याची माहिती तहसीलदारसोनाली मेटकरी व उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे यांनी दिली. 
 दि. १५ जुलै रोजी इंदापूर शहरात 5, तालुक्यातील अकोले येथील 9 तर निमगाव केतकी येथे 1 जण कोरोना बाधितअसल्याचे आढळल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.

पुणेकरांनी एक महिना रोखली अपेक्षित रुग्णवाढ

दरम्यान, अकोले येथील एक महिला कोरोना बाधित असल्याचे आढळल्यानंतर त्यांच्या थेट संपर्कात आलेल्या लोकांच्या घश्यातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 9 जण कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे तर इंदापूर दत्तनगर व कुरेशीगल्लीतील 5 जण कोरोना बाधित असल्याचे त्यांच्या कोरोना चाचणी अंती स्पष्ट झाले आहे. तर निमगाव केतकी मध्ये कोरोना ने आज खाते उघडले आहे. कोरोना रुग्णांच्या थेटसंपर्कात आलेल्या एकूण ३२ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती त्यापैकी १५ जण कोरोना बाधित आल्याने तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.

पुण्यात पीएमपी वाहतूक सुरू करण्याबाबत महत्त्वाचा आदेश

नागरिकांनी घाबरून न जाता शासननिर्देशांचे पालन करावे, फ्ल्यू सारखी लक्षणेअसल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा असे आवाहन पंचायत समितीच्या सभापती सौ.
पुष्पाताई रेडके व नगराध्यक्षा सौ. अंकिता शहा यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Patient is increasing in Indapur taluka