
पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी 123 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 93 हजार 378 झाली आहे.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी 123 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 93 हजार 378 झाली आहे. आज 64 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 89 हजार 657 झाली आहे. सध्या दोन हजार 57 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील चार व शहराबाहेरील दोन रुग्णांचा मृत्यू झाला.
मोशीत प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या 40 भाजी विक्रेत्यांवर कारवाई
शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 664 आणि शहराबाहेरील मृतांची संख्या 684 झाली आहे. आज मृत्यू झालेले शहरातील रुग्ण पुरुष भोसरी (वय 35), थेरगाव (वय 67), चिंचवड (वय 65) व पिंपरी (वय 60) येथील रहिवासी आहेत. आज मृत्यू झालेले शहराबाहेरील पुरुष सोलापूर (वय 76), नऱ्हे आंबेगाव (वय 60) येथील रहिवासी आहेत.
इंधन दरवाढ नको; नोकरदार, वाहतूक व्यावसायिक वैतागले
सध्या महापालिका रुग्णालयांत 893 रुग्ण उपचार घेत आहेत. एक हजार 164 रुग्ण होम आयसोलेट आहेत. कंटेन्मेंट झोन मधील एक हजार 191 घरांना आज स्वयंसेवकांनी भेट देऊन पाहणी केली. त्यात तीन हजार 841 जणांची तपासणी करण्यात आली. आज 389 जणांचे विलगीकरण करण्यात आले. आजपर्यंत 72 हजार 896 जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे.