esakal | पिंपरी-चिंचवडमधील 'या' भाजप नगरसेवकाची प्रकृती चिंताजनक
sakal

बोलून बातमी शोधा

Corporator Laxman Unde health is critical

दिघी येथील साई पार्क सोसायटीत उंडे यांचे निवासस्थान आहे. लष्करातून ते सेवानिवृत्त झाले आहेत. महापालिका निवडणूक पहिल्यांदाच त्यांनी लढवली आणि निवडून आले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली. थेरगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल झाले.

पिंपरी-चिंचवडमधील 'या' भाजप नगरसेवकाची प्रकृती चिंताजनक

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेत प्रभाग क्रमांक चार दिघी- बोपखेलचे प्रतिनिधित्व करणारे नगरसेवक लक्ष्मण धोंडू उंडे यांची प्रकृती चिंताजनक आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर थेरगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

भांडखोर चीनची गुर्मी झाली कमी; म्हणतो, 'भारताला आम्ही शत्रू मानत नाही...

दिघी येथील साई पार्क सोसायटीत उंडे यांचे निवासस्थान आहे. लष्करातून ते सेवानिवृत्त झाले आहेत. महापालिका निवडणूक पहिल्यांदाच त्यांनी लढवली आणि निवडून आले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली. थेरगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल झाले.

मोठी बातमी : पुणे जिल्ह्यातील सर्व संशयितांची कोरोना चाचणी होणार; जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती​

सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असून अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे, असे त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर संदीप वाघ यांनी कळविले असल्याचे महापालिका अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

loading image