मोठी बातमी : पुणे जिल्ह्यातील सर्व संशयितांची कोरोना चाचणी होणार; जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 September 2020

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत आणि नगरपालिका क्षेत्रात टप्प्याटप्प्याने ही तपासणी मोहीम राबविण्यात येईल. यात संशयित आढळलेल्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.​

पुणे : जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत आणि नगरपालिका क्षेत्रात टप्प्याटप्प्यात 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील सर्व नागरिकांची तपासणी करण्यात येणार असून, त्यात संशयित आढळलेल्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. ही मोहीम लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिक यांच्या सहभागाने प्रभावीपणे राबवूया, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले. 

पैसे घेऊन मार्क वाढविणारा अधिकारी पोलिसांच्या ताब्यात; साथीदारांचा शोध सुरू​

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सोमवारी (ता.१४) आयोजित बैठकीत या मोहिमेच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. या वेळी डॉ. देशमुख म्हणाले, ''कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यक्ती आणि कुटुंब केंद्रबिंदू मानून नागरिकांनी आपसात अंतर राखावे. तसेच मास्कचा वापर आणि वारंवार हात धुणे, या त्रिसूत्रीचा सर्वांनी अवलंब करावा.'' 

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत आणि नगरपालिका क्षेत्रात टप्प्याटप्प्याने ही तपासणी मोहीम राबविण्यात येईल. यात संशयित आढळलेल्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. या तपासणीचे उद्दिष्ट कोरोनाबाबत प्रत्येक नागरिकांना शिक्षित करणे, संशयित नागरिकांना तात्काळ शोधून लवकर उपचार सुरू करणे हे आहे. जेणेकरून जिल्ह्यातील मृत्यूदर कमी करता येईल. 

Video : कोरोना काळातील पुणे पोलिसांच्या कार्याने उद्योगपती झाला प्रभावित; ५० लाखांचा दिला मदतनिधी!​

नागरिकांनी दुकाने, कार्यालये आणि आवश्‍यक कामानिमित्त समाजात वावरताना दक्षता घ्यावी. कोरोना बाधित रुग्णांवर वेळेत उपचार मिळवून देण्याबरोबरच आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन जिल्ह्यातील मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी आरोग्य विभागाला केल्या.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All citizens of district will undergo corona test sayd Collector Dr Rajesh Deshmukh