Pimpri chinchwad : शुक्रवारी कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन उपलब्ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona vaccination

Pimpri chinchwad : शुक्रवारी कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन उपलब्ध

पिंपरी : शहरातील १८ वर्षांपुढील नागरिकांना (ता.१२) शुक्रवारी कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लसीचा डोस देण्यात येणार आहे. कियॉस्क टोकन प्रणालीद्वारे लसीकरण सुरु आहे. महापालिकेच्या एकूण ५७ केंद्रावर कोविशिल्ड व ९ केंद्रावर कोव्हॅक्सिनचा डोस दिला जाणार आहे. १८ वर्षावरील सर्वांना प्रत्येकी पहिला व दूसरा असे ५०० डोस उपलब्ध आहेत.

हेही वाचा: मोठी बातमी! एसटी महामंडळाचं होणार खासगीकरण; बैठकीत शिक्कामोर्तब?

इ.एस.आय. हॉस्पिटल, प्रेमलोकपार्क, फकीर भाइ पानसरे उर्दू शाळा, खिंवसरा हॉस्पिटल, नवीन भोसरी रुग्णालय, स्वामी विवेकानंद यमुनानगर, जुने जिजामाता रुग्णालय, निळू फुले नाट्यगृह पिंपळे गुरव या ठिकाणी कोव्हॅक्सिन उपलब्ध आहे. उर्वरित ठिकाणी कोविशिल्ड उपलब्ध आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत लसीकरण सुरु राहणार आहे.

हेही वाचा: "तुम्ही आदिवासींमध्ये फूट पाडत आहात"; फडणवीसांचा पवारांना टोला

स्तनदा व गरोदर मातांसाठी लस राखीव ठेवण्यात आल्या आहेत. जुने भोसरी रुग्णालय पूना पब्लिक स्कूल, भोसरी, आकुर्डी प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल, आकुर्डी यमुनानगर रुग्णालय, अण्णाभाऊ साठे माध्यमिक विद्यालय, संततुकाराम नगर पिंपरी अहिल्यादेवी होळकर सांगवी, मनपा शाळा, खिंवसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव जुने जिजामाता रुग्णालय, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय, चिंचवड या ठिकाणी स्तनदा व गरोदर मातांचे लसीकरण होणार आहे.

loading image
go to top