esakal | कोरोना जनजागृतीसाठी सहा युवकांची सायकलस्वारी 
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना जनजागृतीसाठी सहा युवकांची सायकलस्वारी 
  • सहा जणांनी केला 360 किलोमीटर प्रवास 

कोरोना जनजागृतीसाठी सहा युवकांची सायकलस्वारी 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : सध्या संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आहे. कोरोनाचे सावट अद्याप संपले नाही. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर त्याचे परिणाम झाले आहेत. या आजारावर निश्‍चित औषध नाही. प्रत्येक व्यक्तीमध्ये असलेली रोगप्रतिकारक शक्ती हेच मोठे हत्यार असल्याचा संदेश इंडो ऍथलेटिक सोसायटीच्या सहा सायकलस्वारांनी निगडी -दिवेआगर-निगडी सायकल प्रवासातून दिला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कैवल्य पेठकर, अमित पवार, योगेश तावरे, अभिजित पासलकर, नितीन पवार व मयूर जाधव यांनी कोकण परिसरात 360 किलोमीटरचा प्रवास सायकलवरून केला. नागरिकांना मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतराचे महत्त्व सांगितले. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी सायकलिंगचे महत्त्व व त्या संदर्भातील आहार नागरिकांना मार्गदर्शन केले. या संपूर्ण प्रवासात सायकलस्वारांनी कोठेही बाहेरील खाद्यपदार्थ घेतले नाहीत व स्वतःच्या जेवणाची सोय देखील स्वतःच केली. प्रत्येक ठिकाणी अन्य नागरिकांसोबतचा संपर्क टाळला. 

पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौर पदासाठी भाजपचा उमेदवार ठरला

पिंपरी-चिंचवडमधील निगडी व पुण्यातून वारजेमधून प्रवासास सुरुवात केली. ताम्हिणी घाट-माणगाव मार्गे दिवेआगर असा पहिल्या दिवशी 180 किलोमीटरचा प्रवास केला. दुसऱ्या दिवशी श्रीवर्धन तालुक्‍यातील अन्य ठिकाणी सायकलने प्रवास करीत जनजागृती केली व तिसऱ्या दिवशी पुन्हा माणगाव, ताम्हिणी मार्गे पुण्यात परत 360 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना विषयी लढताना रोगप्रतिकारक शक्तीच सर्वांत महत्त्वाचा घटक आहे व योग्य फिटनेस, आहाराच्या मदतीने रोगप्रतिकारक शक्ती वाढवता येऊ शकते. त्यामुळे सायकलिंग फिटनेससाठी असलेले महत्त्व पटवून देण्यासाठी हा उपक्रम राबविला आल्याचे इंडो ऍथलेटिक सोसायटीच्यावतीने सांगण्यात आले.