esakal | पिंपरी : महापालिका अधिकाऱ्यामुळं जीवाला धोका; पोलीस आयुक्त कार्यालयातील महिलेचा आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad crime

पिंपरी : महापालिका अधिकाऱ्यामुळं जीवाला धोका; महिलेचा आरोप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पेट्रोल पंपासाठी लागणारी परवानगी थांबविल्याने व या प्रकरणात झालेली लेनदेन आपल्याला माहित असल्याने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या मदतीने महापालिकेतील पदाधिकाऱ्याने आपल्याला त्रास दिला. काही दिवसांपासून गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक दररोज आपल्या मागावर असून महापालिकेतील त्या पदाधिकाऱ्यापासून आपल्या जीवितास धोका असल्याचा आरोप पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील महिला वरिष्ठ लिपिकेने केला आहे. याबाबत महिला लिपिकेने राष्ट्रीय महिला आयोग व पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

तक्रार अर्जात म्हटले आहे की, पिंपरी-चिकनवड महापालिकेतील महत्वाच्या समितीच्या पदाधिकाऱ्याने काही महिन्यांपूर्वी पेट्रोल पंपाच्या परवान्या संदर्भात अर्ज केला होता. ही जबाबदारी आपल्याकडे होती. त्यावेळी पदाधिकाऱ्याच्या अर्जात त्रुटी असल्याने परवान्यासाठीची 'एनओसी' थांबून ठेवली. मात्र, आयुक्तालयातील वरिष्ठ पोलिस अधिकारी व महापालिका पदाधिकारी यांच्यात परवान्याच्या अनुषंगाने लेनदेन झाली. फेब्रुवारी २०२१ मध्ये पोलिस अधिकाऱ्याने त्या पदाधिकाऱ्याच्या उपस्थितीत कार्यालयात बोलवून महिला लिपिकाला अपमानास्पद वागणूक दिली. त्यानंतर मार्च २०२१ ला सम्बधित पदाधिकाऱ्याने आपल्या विरोधात पैशांची मागणी केल्याचा खोटा अर्ज केला. तर कार्यालयातील एक कर्मचारी वरिष्ठांच्या सांगण्यानुसार अंगावर धावून आला.

हेही वाचा: एकाच कुटुंबातील पाच मुलं बुडाली; राजस्थानमधील हृदयद्रावक घटना

दरम्यान, या पदाधिकाऱ्यावर नुकतीच एका प्रकरणात कारवाई झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून आपण दुचाकीवर प्रवास करताना काही व्यक्ती आपला पाठलाग करतात. ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे भासत असून माझ्याकडे संशयास्पदरित्या पाहतात. यामुळे आपल्या जीवीताला धोका निर्माण झाला असल्याचे तक्रारदार महिलेने म्हटले आहे.

तसेच पोलिस आयुक्तालयात वरिष्ठांजवळ असणारे काही कर्मचारी प्रत्येक कामात हस्तक्षेप करतात. त्यांच्याकडून महिन्याला ठराविक रकमेची वसुली केली जाते. अनेकदा वरिष्ठ दर्जाच्या महिलांचे 'बॉडीशेमिंग' अश्लील चाळे करून विनोद केले जातात. तसेच काही सहकाऱ्यांकडून मानसिक त्रास दिला जातो, असेही तक्रार अर्जात म्हेल्ट आहे.

"महिला लिपिकेने राष्ट्रीय महिला आयोगाकडे केलेल्या तक्रारीबाबत अद्याप आयोगाकडून कोणत्याही स्वरूपाची माहिती आलेली नाही. आयोगाकडून याबाबत अधिकृत पत्र आल्यानंतर दोन्ही बाजूची सत्यता पडताळून योग्य ती कारवाई केली जाईल.''

- कृष्ण प्रकाश (पोलिस आयुक्त , पिंपरी - चिंचवड)

loading image
go to top