पिंपरी-चिंचवडकरांनो! गांभीर्याने घ्या...कोरोना दारापर्यंत आलाय

Death toll rises in Pimpri-Chinchwad
Death toll rises in Pimpri-Chinchwad

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या वाढत आहे. त्यात आणखी भर पडणार आहे. कारण, उद्या सोमवार रात्रीपासून सुरू होणाऱ्या लाॅकडाउन काळात अधिकाधिक रुग्ण शोधून त्यांच्यावर लवकरात लवकर उपचार करण्यावर भर दिला जाणार आहे. शहराच्या दृष्टीने हा निर्णय योग्य असला तरी आजार लपवून ठेवणे घातक ठरू शकते. कारण, मृतांची संख्या वाढत आहे. 

कोण म्हणते गुटख्याला बंदी? या ठिकाणी होते खुलेआम विक्री

लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर व शहराला रेडझोनमधून वगळल्यानंतर रूग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. 11 मार्च ते 31 मेपर्यंत अवघी 522 असलेली रुग्णसंख्या जून अखेरपर्यंत तीन हजारावर गेली होती. ती आता सात हजारांपर्यंत पोचली आहे. मध्यंतरी सर्वाधिक रुग्णवाढ दाट लोकवस्ती व झोपडपट्यांमध्ये होत आहे, असे चित्र होते, परंतु, आता सगळीकडेच रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे लाॅकडाउनचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

कोरोनाचा पहिला रुग्ण अकरा मार्चला आढळला. तेव्हापासून आजपर्यंत म्हणजेच गेल्या चार महिन्यांत कोरोनाची वाटचाल कशी राहिली, याचा हा आढावा...

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

३१ मे ची स्थिती

- दिवसभरात संसर्ग 5 
- दिवसभरात डिस्चार्ज 10
- एकूण रुग्णांची संख्या 522
- उपचार घेत असलेले 252
- आजपर्यंत बरे झालेले 262
- एकूण मृत्यू 8

शहरातील 30 जूनची स्थिती
- दिवसभरात संसर्ग 196
- दिवसभरात डिस्चार्ज 103
- एकूण रुग्णांची संख्या 3104
- उपचार घेत असलेले 1122
- आजपर्यंत बरे झालेले 1862
- एकूण मृत्यू 47
- जून महिन्यात मृत्यू 39
- महिनाभरात रुग्णवाढ 2509

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एक ते 12 जुलै बारा दिवसातील स्थिती
- आज सकाळी साडेदहापर्यंत संसर्ग 75
-  डिस्चार्ज 59
- एकूण रुग्णांची संख्या 7078
- उपचार घेत असलेले 2811
- आजपर्यंत बरे झालेले 4166
- एकूण मृत्यू 102...
- बारा दिवसांत मृत्यू 55
- बारा दिवसांत रुग्ण वाढ 3964

शहरातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असली तरी, रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही जास्त आहे. रविवारी सकाळी साडेदहा वाजेपर्यंत बरे झालेल्यांची संख्या 4166 होती. आजपर्यंत 4041 पुरुष आणि 3033 महिलांना संसर्ग झालेला आहे. शिवाय, संसर्ग झालेल्यांमध्ये 22 ते 39 वयोगटातील तरुणांची संख्या सर्वाधिक 2790 आहे. त्या खालोखाल 40 ते 59 वयोगटातील प्रौढांची संख्या 1975 आहे. कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे, असे सांगितल्या जाणाऱ्या 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि 12 वर्षांखालील मुलांची संख्या अनुक्रमे 835 आणि 699 आहे. 13 ते 21 वयोगटातील 771 युवकांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे.  

मृत्यूची कारणे 
- प्रतिकार शक्ती कमी असलेले 
- फुफ्फूस, हृदयविकार, मधूमेह, रक्तदाब, कर्करोग, किडनी विकार 
- प्रकृती गंभीर झाल्यानंतर काही तास अगोदर रुग्णालयात दाखल 
- वरील कारणांमुळे 95 टक्के मृत्यू होत आहेत. तर, कोरोनामुळे अवघे पाच टक्के मृत्यू होत आहेत, असे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com