esakal | कामशेतमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला हा निर्णय, पण त्यावर अनेकानी केल्या तक्रारी!
sakal

बोलून बातमी शोधा

कामशेतमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला हा निर्णय, पण त्यावर अनेकानी केल्या तक्रारी!

शहरात शुक्रवारी (ता. ३) दत्त कॉलनीतील ६१ वर्षीय कोरोनाबाधित रुग्ण आढळला. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील व्यापाऱ्यांनी बाजारपेठ दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

कामशेतमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला हा निर्णय, पण त्यावर अनेकानी केल्या तक्रारी!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कामशेत (ता. मावळ) : शहरात शुक्रवारी (ता. ३) दत्त कॉलनीतील ६१ वर्षीय कोरोनाबाधित रुग्ण आढळला. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील व्यापाऱ्यांनी बाजारपेठ दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयात ग्रामपंचायत, महसूल विभागाला विश्वासात न घेता हा निर्णय घेतला, अशी तक्रार होत आहे. तसेच, या बंदची माहिती नागरिकांना ऐनवेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली. त्यामुळे किरकोळ व्यावसायिक, दुकानदार, दुग्ध व्यावसायिक आणि भाजीपाला विक्रेते यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची ओरड होत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

शनिवारी (ता. ४) ते रविवार (ता. ५) असा दोन दिवसीय कडकडीत बंद पाळण्याचा परस्पर निर्णय व्यापारी असोसिएशन, पोलिस प्रशासन आदींनी घेतला. या बाबत सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज या मध्यवर्ती चौकात तसा व्यापारी असोसिएशन यांनी बोर्ड लावला. मात्र, या बाबत स्थानिक नागरिक व आजूबाजूच्या नागरिकांना व किरकोळ दुकानदारांना माहिती भेटली नाही. त्यामुळे सकाळपासून कामशेत शहरात वाहनांची वर्दळ होती. दुकाने मात्र, काही बंद तर काही सुरु होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे म्हणाले, "अमावस्या आणि पौर्णिमेला शहरातील दुकाने बंद असतात. सध्या चातुर्मासमुळे काही दुकाने बंद आहेत. अत्यावश्यक दुकाने सुरू आहेत." 

हेही वाचा- राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांनी गाजवलेली ती सभा ठरली शेवटचीच!

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विलास भटेवरा म्हणाले, "चातुर्मास सुरू असल्याने बाजारपेठ बंद आहे." ग्रामसेवक प्रताप माने म्हणाले, की मला याविषयी काही माहिती नाही. मी चौकशी करून सांगतो. प्रभारी सरपंच अभिमन्यू शिंदे म्हणाले, की दोन दिवस बाजारपेठ बंदचा निर्णय घेताना व्यापारी असोसिएशनने विश्वासात घेतले नाही. त्यामुळे याबाबत नागरिकांना योग्य आवाहन करता आले नाही. त्यामुळे नागरिक व किरकोळ विक्रेत्यांची गैरसोय झाली.

हेही वाचा- नगरसेवक दत्ता साने यांच्यासारखा झुंजार सहकारी गमावला : अजित पवारांची श्रद्धांजली

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दुकानदार विकास ननावरे, दुग्ध व्यावसायिक पंकज ढवळे म्हणाले, "बाजारपेठ बंदबाबत कोणतीही पूर्व कल्पना मिळाली नाही. त्यामुळे आम्हाला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला." दरम्यान रविवारी बाजारपेठ सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू राहिल, असे आवाहन दुपारी व्यापारी असोसिएशनने केले. त्याचप्रमाणे हाही निर्णय सोशल मीडियावर व्हायरल केला. शहरात मागील काही दिवसांपूर्वी एका नऊ महिन्याच्या चिमुकल्याला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले होते. त्यानंतर काल शुक्रवारी ६१ वर्षीय व्यक्तीसदेखील कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दोन झाली आहे.