आश्चर्य! रेंज नसतानाही ऑनलाइन अभ्यासक्रम पूर्ण 

दिनेश टाकवे
Thursday, 1 October 2020

  • नाणे मावळातील काही शाळांची स्थिती 
  • शिक्षक-विद्यार्थी उत्साही, सुविधांचा अभाव 

करंजगाव (ता. मावळ)  : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी राज्यात शाळा बंद आहेत. सरकार व शिक्षकांच्या प्रयत्नातून सर्वत्र ऑनलाइन शिक्षण चालू आहे. नाणे मावळच्या ग्रामीण भागातील नाणे, कांबरे, करंजगाव, कोंडिवडे, गोवित्री, उकसाण आदी गावांत ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. मात्र, शिक्षक-विद्यार्थी उत्साही असूनही सुविधांच्या अभावामुळे ऑनलाइन शिक्षण प्रक्रियेपासून वंचित राहत आहे. मात्र, दुसरीकडे शिक्षण विभागाकडून अभ्यासक्रम कागदोपत्रीच पूर्ण केला जात आहे. 

पिंपरी-चिंचवडमधील कोविड सेंटर होणार बंद; कारण ऐकून मिळेल दिलासा

ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षणामध्ये मोबाईल फोन नसणे, नेटवर्क नसणे, नेटवर्क असले तर नेटपॅक संपलेला असणे आदी समस्या असतात. तसेच ग्रामीण भागातील पालकवर्ग हा शेतकरी तसेच कामगार असल्याने घरात ऑनलाइन तास चालू असताना विद्यार्थ्यांना घरी मोबाईल मिळतोच असे नाही. करंजगावचे मुख्याध्यापक बापूराव नवले म्हणाले, "एकूण पटसंख्येच्या साठ टक्के विद्यार्थी व्हाट्‌सऍपवर आहेत. परंतु त्यातील वीस ते तीस टक्केच विद्यार्थी प्रतिसाद देतात. वळवंती, वडवली, कोळवाडी, भाजगाव, सोमवडी, थोरण, जांभवली, ब्राम्हणवाडी, पाले आदी गावांत मोबाईलला नेटवर्कच नसते. तेथील नागरिकांना गावात किंवा गावाबाहेर ठराविक ठिकाणीच नेटवर्क मिळते. याशिवाय नाणे गावातील टॉवर महिनाभर नादुरुस्त अवस्थेत आहे. ठराविक कंपनीच्या सीमकार्डला ठराविक ठिकाणी रेंज मिळते, असे असताना येथील विद्यार्थ्यांचा ऑनलाइन अभ्यासक्रम पूर्ण होत नाही. 

आगीनं आमची रोजी रोटीच केली खाक; पिंपरीतील दीडशे महिलांचा आक्रोश

सध्याच्या परिस्थितीत आहार, व्यायाम, अवांतर वाचन याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे. शक्‍य आहे त्यांनी ऑनलाइन पद्धतीने अभ्यास चालू ठेवावा, असे येथील शिक्षक अशोक वाडेकर, अनिल सातकर, अजित मोरे यांनी सांगितले. सर्व समस्यांवर मात करून करंजगाव पठार व मोरमारेवाडी येथील शाळेतील शंभर टक्के विद्यार्थी दररोज ऑनलाइन तासाला हजर राहतात व आपला अभ्यास पूर्ण करतात, अशी माहिती कांबरे केंद्रप्रमुख युनूस मुलाणी यांनी दिली. 

'अभ्यासासाठी यु ट्यूब चॅनेल' 
नाणे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक स्वप्नील नागणे व करंजगावच्या गोल्डन ग्लेड्‌स माध्यमिक विद्यालयाचे शंकर धावणे यांनी ऑनलाइन अभ्यासासाठी यू-ट्यूब चॅनेल सुरू केले आहे. त्यांना संपूर्ण जिल्ह्यातून प्रतिसाद मिळत आहे. 

निवृत्त झालेल्या ड्रायव्हर काकांसाठी अतिरिक्त आयुक्त स्वत: बनले ड्रायव्हर!

ग्रामीण भागत ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देताना खूपच मर्यादा व अडचणी येत आहेत. सरकारच्या नियमानुसार शिक्षकांना घरी बसून हे काम करायला सांगितले आहे. त्यामुळे खेड्यातील वाड्या-वस्त्यांवरील विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिकविणे आवश्‍यक गोष्ट आहे. यासाठी ज्या गावात अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही. तेथे शिक्षकांना बोलावून चौदा दिवस क्वारंटाइन करून तिथेच राहण्याची व्यवस्था केल्यास सुरळीत शिक्षण देता येईल.
- मंगल वाव्हळ, गटशिक्षण अधिकारी, मावळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: deprived of students from online education at nane maval