भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या शहराध्यक्षपदाच्या राजीनाम्याची चर्चा; काय आहे वास्तव घ्या जाणून

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 27 August 2020

आज महापालिकेची सर्वसाधारण सभा होती. त्यात आमदार लांडगे समर्थक नगरसेवक अनुपस्थित होते. त्यामुळे दोन्ही आमदारांच्या वैचारिक मतभेदाचा हा परिणाम असल्याची चर्चा सुरू झाली.

पिंपरी : भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष व भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा बुधवारी शहरात रंगली. दरम्यान, त्यांचा मोबाईलही स्वीचऑफ लागत असल्याने चर्चेला आणखीच उधान आले. मात्र, असे काही नसल्याचे त्यांचे बंधू कार्तिक लांडगे यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 ► क्लिक करा

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आहे. मात्र, शहराची विभागणी पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभा मतदारसंघ आणि मावळ व शिरून लोकासभा मतदारसंघामध्ये झाली आहे. पिंपरी व चिंचवड मतदारसंघाचा समावेश मावळ लोकसभा मतदारसंघात तर, भोसरीचा समावेश शिरूर लोकसभा मतदारसंघात येतो. आमदार लांडगे यांच्याकडे भाजप शहराध्यक्ष पदाची सुत्रे गेल्यावर्षी आलीत. त्यापूर्वी शहराध्यक्षपदाची सुत्रे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडे होती. 

वडिलोपार्जित मालमत्ता एकट्याला हवी आहे, तर...

महापालिकेत 128 नगरसेवकांपैकी एकट्या भाजपचे 77 नगरसेवक आहेत. त्यात आमदार लांडगे समर्थक आणि आमदार जगताप समर्थक नगरसेवकांची संख्या जवळपास समसमान आहे. तसेच, भाजप निष्ठावंत नगरसेवकांचाही स्वतंत्र गट आहे. 

आज महापालिकेची सर्वसाधारण सभा होती. त्यात आमदार लांडगे समर्थक नगरसेवक अनुपस्थित होते. त्यामुळे दोन्ही आमदारांच्या वैचारिक मतभेदाचा हा परिणाम असल्याची चर्चा सुरू झाली. कारण, गेल्या आठवड्यातील स्थायी समिती सभेत चिंचवड मतदारसंघातील वाकड- ताथवडे प्रभागातील नवीन चार रस्त्यांच्या निर्मितीच्या विषयास जगताप समर्थक नगरसेवकांचा विरोध होता. तर शिवसेनेची भूमिका रस्त्याचा विषय मंजूर करावा अशी होती. त्या वेळी दोन रस्त्यांचे विषय तहकूब ठेवून दोन रस्त्यांच्या विषयांवर मतदान घेण्यात आले होते. त्यात लांडगे समर्थक नगरसेवकांनी प्रस्तावाच्या म्हणजेचे शिवसेनेच्या बाजूने मतदान केले होते. त्यावरून दोन्ही आमदारांमध्ये मतभेद असल्याची चर्चा रंगली होती. आजच्या सर्वसाधारण सभेत लांडगे समर्थक नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने दुपारनंतर आमदार लांडगे यांच्या शहराध्यक्षपदाच्या राजीनाम्याची चर्चा पसरली. 

'जम्बो सेंटर'नंतर आता पश्‍चिम पुण्यासाठी नवं कोरोना हॉस्पिटल; महापौरांनी दिली माहिती​

राजीनाम्याबाबत आमदार लांडगे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांचा मोबाईल बंद लागत होता. त्यामुळे त्यांचे बंधू कार्तिक लांडगे यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले, "राजीनाम्याचा प्रश्‍नच येत नाही. एका कार्यक्रमानिमित्त आमदार कळस येथे गेले आहेत. न्यूज चॅनेलवाल्यांनी ही अफवा पसरवली आहे. तसेच, आमचे नगरसेवक सर्वसाधारण सभेत ऑनलाइन उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ऑनलाइन उपस्थित राहण्याची सुविधा उपलब्ध आहे.''  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Discussion on the resignation of BJP city president MLA Mahesh Landge