
वाकड गावठाण येथील पाच दशलक्ष लिटर क्षमतेचे संपवेल मधून सांडपाणी प्रक्रियाविना थेट मुळा नदी पात्रात सोडण्यात येत आहे. याप्रकरणी चार दिवसांचे लाक्षणिक उपोषण करूनही महापालिकेच्या पर्यावरण विभागाला जाग आलेली नाही. कारवाई करण्याऐवजी गलथान कारभार सुरूच ठेवला आहे. त्यामुळे नदीपात्रातील जीवसृष्टी आणि नागरिकांच्या जिवास धोका निर्माण झाला आहे, अशी तक्रार रयत विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष सूर्यकांत सरवदे यांनी केली आहे.
पिंपरी - वाकड गावठाण येथील पाच दशलक्ष लिटर क्षमतेचे संपवेल मधून सांडपाणी प्रक्रियाविना थेट मुळा नदी पात्रात सोडण्यात येत आहे. याप्रकरणी चार दिवसांचे लाक्षणिक उपोषण करूनही महापालिकेच्या पर्यावरण विभागाला जाग आलेली नाही. कारवाई करण्याऐवजी गलथान कारभार सुरूच ठेवला आहे. त्यामुळे नदीपात्रातील जीवसृष्टी आणि नागरिकांच्या जिवास धोका निर्माण झाला आहे, अशी तक्रार रयत विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष सूर्यकांत सरवदे यांनी केली आहे. त्यांनी आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे दाद मागितली आहे. याबाबत पुन्हा आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे तक्रार केली आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सरवदे म्हणाले, 'मुळा - मुठा नदी पात्रात पिंपळे निलख येथील मैला शुद्धीकरण केंद्रातून सांडपाणी विनाप्रक्रिया बायपासद्वारे नदीपात्रात सोडण्यात येत होते. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला वारंवार निदर्शनास आणून दिले आहे. मंडळाने कारवाईचे पत्र पिंपरी चिंचवड महापालिकेस दिल्यानंतरही महापालिका या नदी प्रदूषणाबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. वाकड गावठाण स्मशानभूमी जवळील जलनिस्सारण विभागाच्या अंतर्गत येणारे पाच दशलक्ष लिटर क्षमतेचे संपवेल स्थापन झाल्यापासून सांडपाण्यावर प्रक्रिया न करता सांडपाणी नदीपात्रात सोडले जात आहे.
शाळा बंद, मग टेबल-खुर्च्या कोणासाठी; पिंपरी-चिंचवडमधील प्रकार
वाकड संपवेल पासून पिंपळे निलख मैला शुद्धीकरण केंद्रापर्यंत कोणतेही ड्रेनेज नेटवर्क नाही. त्यामुळे जे वाकड परिसरातील सांडपाणी प्रक्रियाविना नदीपात्रात सोडल्यामुळे नदीपात्रातील जीवसृष्टी आणि नागरिकांच्या जिवास धोका निर्माण झाला आहे. नदीपात्रात सोडलेल्या पाण्याचा उग्र स्वरूपात वास येत आहे. यावर गेली 10 वर्षापासून कोणीच आवाज उठवत नाही. संबंधित नदी प्रदूषणाबाबत रयत विद्यार्थी परिषदेने निदर्शनास आणून दिल्यावरही महापालिका कारवाई करताना दिसत नाही.
पिंपरी-चिंचवडच्या 487 पोलिसांना नववर्षानिमित्त मिळाली अनोखी भेट
मंडळ व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा वाकड जल:निस्सारण विभागाच्या अंतर्गत येणारे 5 दशलक्ष लिटर क्षमतेच्या संपवेलची पाहणी करावी. ज्यामुळे वाढत्या नदी प्रदूषणास आळा बसेल. याबाबत लवकरात लवकर कारवाई करून नद्यांचे संवर्धन आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करावे, असे सरवदे यांनी नमूद केले आहे.
Edited By - Prashant Patil