esakal | तरकारीमुळे अर्थचक्र कोलमडले
sakal

बोलून बातमी शोधा

Vegetable

तरकारीमुळे अर्थचक्र कोलमडले

sakal_logo
By
प्रशांत पाटील

पिंपरी - शहरातील हॉटेल व्यवसाय (Hotel Business) दीड वर्षांपासून मोडकळीस आला आहे. या व्यवसायालाच खीळ बसल्याने थेट परिणाम तरकारी व्यावसायिकांवर (Vegetable Businessman) झाला. शेतमालाचे भाव घसरले असून ग्रामीण भागाचे अर्थचक्र कोलमडले आहे. परिणामी, गुलटेकडी, मोशी व पिंपरी मार्केटमधून हॉटेल व्यवसायासाठी दररोज मोठ्या प्रमाणात लागणारी शेकडो टन तरकारीची विक्री अवघ्या २० टक्क्यांवर आली आहे. (Economics Condition Colapse by Vegetables)

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात सध्या ग्रामीण व शहरी भागातून आलेली तरकारी बाजारात पडून राहत आहे. साधारणपणे भाजी मार्केटमधील एका तरकारी मध्यस्थीकडून ५० बड्या हॉटेलला पुरवठा होतो. हॉटेलांसाठी शेकडो टनामध्ये लागणारी तरकारी किलोवर आली आहे. सध्या हॉटेल व्यावसायिकांना कांदा, टोमॅटो, लसूण, आले, बटाटा, कोबीची साठवणूक करणे अवघड झाले आहे. त्यामुळे, तरकारीचे भाव घसरले. टोमॅटो, कांद्याला मागणी नसल्याने शेतकरीही हवालदिल झाला. हॉटेल व्यावसायिक, तरकारी पुरवठादार, मूळ तरकारी विक्रेते, शेतकरी अशी साखळीच कोलमडली आहे.

हेही वाचा: पिंपरी चिंचवड मधील मतदार छायाचित्रांबाबत उदासीन

चायनीज भाज्यांना फटका

थ्री व फाइव्ह स्टारमध्ये सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या चायनीज भाज्यांनाही मार बसला आहे. हॉटेलमध्ये विविध प्रकारच्या भाज्यांमध्ये चायनीज कोबी, पात, ब्रोकोली, झुकिनी, रंगीत सिमला मिरचीची विक्री बंद आहे. सिमला मिरची १०० ते १५० रुपयांवरून १० ते १५ रुपये किलोप्रमाणे विकली जात असल्याचे चित्र बाजारात आहे.

हॉटेल व्यावसायिक म्हणतात...

हॉटेलमधील बैठक व्यवस्थाच बंद झाल्याने सध्या २० टक्के तरकारी आम्ही घेत आहोत. कारण, हॉटेलसाठी लागणारी तरकारी ही मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यानंतरच आम्हाला परवडते. फाइव्ह व सेव्हन स्टार हॉटेलला रोजची अडीच ते तीन टन तरकारी लागते. परंतु, सध्या चारपर्यंत परवानगी असल्याने नागरिक हॉटेलकडे दुपारच्या वेळेत जेवणासाठी येत नाहीत. घरगुती जेवणाकडे कल वाढला आहे. एकूणच व्यवसायावर परिणाम झाल्याने तरकारीची मागणी आपोआप कमी झाली आहे.

हेही वाचा: गावगाड्याच्या विकासाला कोरोनाची ‘खीळ’; ग्रामपंचायतींच्या उत्पन्नात घट

सध्या पूर्ण क्षमतेने सुरू असलेल्या ३० टक्के हॉटेल, रेस्टॉरंट व चायनीज हॉटेलला लागणारी तरकारीची मागणीदेखील निम्म्याने घटली आहे. विविध प्रकारच्या फळभाज्यांची मागणी टनावरून किलोवर आली आहे. लॉकडाउनपूर्वी ७० टक्के टोमॅटो हॉटेल व्यावसायिकांकडे जात होते. दैनंदिन ३०० ते ४०० किलो व्यावसायिक टोमॅटो घेत होते. साधारण ५० रुपयांपर्यंत विक्री होणारा मे-जूनमधील हा माल १२ ते १५ रुपयांने विकला जात आहे. आले ५० ते ७० रुपयांवरून १० ते २० रुपयांवर आले आहे. त्याचप्रमाणे कांद्याचे दरही सध्या २० ते २२ रुपये किलो आहे. बाजाराला उठाव असता तर हाच कांदा ३० रुपयांच्या पुढे गेला असता.

- सुहास जाधव, तरकारी व्यावसायिक, गुलटेकडी मार्केट

तरकारी व्यावसायिक

  • ४०० - गुलटेकडीतील घाऊक विक्रेते

  • २००० - विनापरवाना किरकोळ विक्रेते

  • १५० - मोशी घाऊक विक्रेते

  • ४०० ते ५०० - पिंपरीतील किरकोळ विक्रेते

loading image