पिंपरी-चिंचवड : वीज कर्मचारी-अधिकारी-अभियंता सेनेची पुणे कार्यकारिणी जाहीर

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 September 2020

आकुर्डी येथे वीज कर्मचारी-अधिकारी-अभियंता सेनेचा कार्यक्रम पार पडला.

पिंपरी : "महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती कंपन्यांमध्ये संघटनेचे काम करताना राजकीय काम कमी आणि कंपनीचे काम प्राधान्याने करावे. कंपनीचा विकास झाला, तरच कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होतो. त्यामुळे कंपनी सक्षम करण्यासाठी संघर्ष करा,'' असे आवाहन राज्याच्या किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष व भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस डॉ. रघुनाथ कुचिक यांनी केले. 

हेही वाचा- पिंपरी-चिंचवडमध्ये 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेला सुरुवात

हेही वाचा- मावळात आज ७६ नवे पॉझिटिव्ह, तर दोघांचा मृत्यू

आकुर्डी येथे वीज कर्मचारी-अधिकारी-अभियंता सेनेचा कार्यक्रम पार पडला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष राजन भानुशाली, महाराष्ट्र विद्युत संनियंत्रण समिती पुणे जिल्हा सदस्य संतोष सौंदणकर, भारत कुंभारकर, दीपक शेंडे, विनायक जाधव, शिलरत्न साळवे, प्रशांत लबडे पाटील, शुभम दिघे, संजय जाळिंद्रे, राजेश गाढवे, नितीन बोंडे उपस्थित होते. भानुशाली म्हणाले, "गाव तिथे वीज आणि वीज तिथे वायरमन आहे. म्हणजेच गाव तिथे सभासद होण्याची खात्री आहे. प्रत्येकाला संघटनेच्या धाग्यात गुंफता आली पाहिजे. संघटनेचे प्रामाणिक काम केले, तरच आपण कंपनीला मोठे करू शकतो.'' महेश दरेकर यांनी सूत्रसंचालन केले. आकाश पवार यांनी आभार मानले. 

नवनियुक्तांना मानपत्र वाटप 

वीज कर्मचारी-अधिकारी-अभियंता सेनेची पुणे कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी मनोहर शिंदे यांची निवड झाली. कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :अमोल नांदे (उपाध्यक्ष), नीलेश मानकर (कार्याध्यक्ष), संदीप गावडे (सल्लागार), धनंजय पवार (सहकार्याध्यक्ष), महेश दरेकर (सचिव), अमोल हंडीबाग (सहसचिव), राहुल गाडे (खजिनदार), मालती लांडगे (महिला आघाडी अध्यक्षा) यांची नियुक्ती केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: electricity staff-officer executive announced at akurdi