पिंपरी-चिंचवडकरांनो, आजचा मृत्यूचा आकडा पाहा आणि आतातरी आपली काळजी घ्या!

VIRUS.jpg
VIRUS.jpg

पिंपरी : शहराच्या विविध भागातील 1034 आणि शहराबाहेरील 43 अशा 1077 जणांना आज (बुधवारी) कोरोनाची लागण झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 316 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, शहरातील रुग्णसंख्या 19  हजार पार झाली असून 19 हजार 431 वर पोहोचली आहे.

आज 11  जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात भोसरीतील 52 वर्षीय पुरुष, पिंपरीतील 80 वर्षीय वृद्ध,  दापोडीतील 27, 32 वर्षाचे दोन युवक,  चिंचवडगावातील 86 वर्षीय पुरुष, दिघीतील 40 वर्षाची महिला, खराळवाडीतील 68 वर्षीय पुरुष,   निगडीतील 65 वर्षीय महिला,  चाकण मधील 43 वर्षीय महिला,पाषाण येथील 65 वर्षीय आणि  शिरुर येथील 79 वर्षीय वृद्धचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 19 हजार 431 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 12278 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील  311 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 82 अशा 393 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या  3142 सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजचा वैद्यकीय अहवाल
दाखल संशयित - 5172
पॉझिटीव्ह -1077
निगेटीव्ह  - 3999
चाचणी अहवाल प्रतिक्षा -1399
रुग्णालयात दाखल एकूण - 3142
डिस्चार्ज झालेले रुग्ण - 4956
आजपर्यंतचे कोरोना पॉझिटीव्ह -19,431
सक्रिय पॉझिटीव्ह - 3142
आजपर्यंत मृत्यू -393
आजपर्यंत कोरोना मुक्त -12278
दैनंदिन भेट दिलेली घरे - 24653
दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या - 84531  

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com