...म्हणून पिंपरी-चिंचवडमधील उद्योजक झालेत त्रस्त 

theft.jpg
theft.jpg

पिंपरी : मनुष्यबळ, कच्चा माल यांच्या कमतरतेमुळे आधीच त्रस्त झालेल्या उद्योजकांना आता वाढत्या चोऱ्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे चोऱ्या रोखण्यासाठी सामान्यपणे पोलिस आयुक्तांपर्यंत तक्रारी करणाऱ्या उद्योजकांनी आता थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांनाच साकडे घातले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


पिंपरी-चिंचवड परिसरात अनेक उद्योग लॉकडाउनच्या काळामध्ये लवकर बंद होतात आणि बऱ्याच कंपन्यांमध्ये कामच नसल्याने त्या कंपन्या बंद आहेत. बंदीमुळे अनेक कंपन्यांना कामे नाहीत. त्यात आर्थिक नुकसान सोसावे लागते. सध्या बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे असे लोक गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळत आहेत. 

रखवालदारांचा अभाव 
इंजिनिअरिंग क्षेत्रातील लोखंडावर प्रक्रिया करणाऱ्या हजारो कंपन्या आहेत आणि छोटे-मोठे पाच ते सहा हजार कारखाने आहेत. अनेक कंपन्यांमध्ये रात्री चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. कंपन्यांमधील रखवालदार परराज्यातील होते. ते आपापल्या गावी गेले आहेत. अनेक कंपन्यांमध्ये वयस्कर रखवालदार असतात. तसेच रस्त्यावर अनेक अनधिकृत टपऱ्या झाल्या आहेत. या टपऱ्यांचा आश्रयही चोरी करणारे गुन्हेगार घेत आहेत.

 
कंपन्यांमधील रात्रपाळी बंद 
सध्या अनेक कंपन्या संध्याकाळी सात वाजता बंद असतात. रात्रपाळी अनेक कंपन्यांची सुरू नसते. त्यामुळे परिसरात सात नंतर सामसूम असते. त्याचा गैरफायदा घेतला जातो. पीसीएमसीच्या रस्त्यावरील विजेच्या खांबावर दोष निर्माण करून परिसरात अंधार केला जातो. सर्वसामान्य उद्योजक या त्रासाला कंटाळले असून अनेकांच्या मालमत्तेला धोका निर्माण झाला आहे. यावर सरकारने आणि पोलिसांनी लवकर पावले उचलून कठोर कारवाई करावी. 

यासंदर्भात लघुउद्योग भारती या उद्योजकांच्या संघटनेचे सचिव राहुल खोले यांनी सांगितले, ""लॉकडाउनच्या कालावधीत अनेकांना रोजगार गमवावा लागला. त्यापैकी कित्येकांना पुन्हा रोजगार मिळालेला नाही. त्यामुळे केवळ कंपन्याच नव्हे तर अन्यत्रही किरकोळ चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसते.'' पोलिसांच्या दप्तरी कंपन्यांमधील चोऱ्यांची स्वतंत्र आकडेवारी उपलब्ध नसते. पोलिस उपायुक्त स्मिता पाटील यांच्याशी याबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने त्यांची प्रतिक्रीया मिळू शकली नाही. 

`या` आहेत मागण्या 
- परिसरात रात्री गस्त योजना वाढवावी 
- पोलिसांनी वाहनांची तपासणी करावी 
 

महापालिकेच्या झाडांच्या लोखंडी जाळ्यासुद्धा चोरीला जात आहेत तर उद्योगांची काय स्थिती असेल याचा अंदाज लावावा. त्यामुळे पोलिसांनी चोऱ्या रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात. 
- अभय भोर, अध्यक्ष, फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अससोसिएशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com