esakal | परप्रांतीयांना पुन्हा ओढ चाकणची
sakal

बोलून बातमी शोधा

चाकण, ता. खेड, येथील औद्योगिक वसाहतीतील कंपन्यात पुन्हा कामासाठी आलेले उत्तरप्रदेशातील कामगार.

अनलॉक नंतर औद्योगिक वसाहतीत कामासाठी पुन्हा परप्रांतीयांचे लोंढे परतू लागले आहेत. सुमारे दहा हजारावर परप्रांतीय आल्याने बहुतांश कंपन्यांची चाके पुन्हा फिरू लागली आहेत. येत्या महिनाभरात पंचवीस हजारावर परप्रांतीय कामगार, मजूर येणार आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात पुन्हा अर्थचक वेगात फिरणार असल्याची शक्यता कामगार नेते,उद्योजक यांच्याकडून वर्तविली जात आहे.

परप्रांतीयांना पुन्हा ओढ चाकणची

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

चाकण - अनलॉक नंतर औद्योगिक वसाहतीत कामासाठी पुन्हा परप्रांतीयांचे लोंढे  परतू लागले आहेत. सुमारे दहा हजारावर परप्रांतीय आल्याने बहुतांश कंपन्यांची चाके पुन्हा फिरू लागली आहेत. येत्या महिनाभरात पंचवीस हजारावर परप्रांतीय कामगार, मजूर येणार आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात पुन्हा अर्थचक वेगात फिरणार असल्याची शक्यता कामगार नेते,उद्योजक यांच्याकडून वर्तविली जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाउन मुळे तीन महिने औद्योगिक वसाहतीतील कंपन्या बंद राहिल्या. हाताला काम नाही, त्यामुळे पोटाचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे परप्रांतीयांचे लोंढे आपल्या गावाला परराज्यात गेले. उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, मध्यप्रदेश, छत्तीसगड, ओरिसा या राज्यातील कामगार, मजूर गावाला निघून गेले. पण अनलॉक झाल्यानंतर बहुतांश कामगार मिळेल त्या वाहनाने, रेल्वेने राज्यात येऊ लागले आहेत. अजून बहुतांश रेल्वेसेवा सुरू झाल्या नाहीत.

...तर 'जम्बो' व्यवस्थापनावर कारवाईची छडी उगारली जाणार; अतिरिक्त आयुक्तांचा इशारा

त्यामुळे ही काही कामगार परराज्यात अडकले आहेत. काही  मालवाहू ट्रक, बसद्वारे येत आहेत. राज्यातील इतर जिल्ह्यातील बहुतांश कामगार, मजूर कामासाठी चाकणला परतले आहेत. भाड्याच्या खोल्या कामगार, मजूर गावी गेल्याने रिकाम्या झाल्या होत्या.त्या खोल्यात भाडेकरू भरू लागले आहेत.

पानशेत धरणामध्ये बेकायदा बोटींग; पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

याबाबत बजाज कंपनीचे वरीष्ठ उपाध्यक्ष कैलास झांजरी यांनी सांगितले की,परप्रांतीय कामगार,मजूर मिळत नसल्याने बहुतांश छोट्या कंपन्या   वर्कशॉप बंद होते. परप्रांतीय कामगार,मजूर आल्याने  छोट्या कंपन्या सुरू झाल्या आहेत.उत्पादनही सुरू आहे. स्वाभिमानी कामगार संघटनेचे राज्याचे अध्यक्ष जीवन येळवंडे यांनी सांगितले की, राज्यातील बहुतांश कामगार, मजूर कंपन्यांत कामासाठी आले आहेत. परराज्यातील पंधरा हजारावर कामगार,मजूर आले आहेत. अजूनही काही येत आहेत.त्यामुळे कंपन्यांचे उत्पादन सुरळीत सुरू आहे.

चाकण, ता. खेड, येथील औद्योगिक वसाहतीतील कंपन्यात पुन्हा कामासाठी आलेले उत्तरप्रदेशातील कामगार

Edited By - Prashant Patil