esakal | पानशेत धरणामध्ये बेकायदा बोटींग; पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष
sakal

बोलून बातमी शोधा

panshet dam.jpg

जिल्ह्यातील पर्यटन स्थळांसह धरणांचा परिसर पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद राहील असा पुणे जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश असताना पानशेत धरणामध्ये मात्र बेकायदा बोटींग सुरू असल्याचे आढळून आले आहे. एकाच बोटीवर अनेक पर्यटक बसवले जात असल्याने बोटींग व्यावसायिकाकडून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचेही राजरोसपणे उल्लंघन सुरू आहे.

पानशेत धरणामध्ये बेकायदा बोटींग; पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

किरकटवाडी (पुणे) : जिल्ह्यातील पर्यटन स्थळांसह धरणांचा परिसर पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद राहील असा पुणे जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश असताना पानशेत धरणामध्ये मात्र बेकायदा बोटींग सुरू असल्याचे आढळून आले आहे. एकाच बोटीवर अनेक पर्यटक बसवले जात असल्याने बोटींग व्यावसायिकाकडून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचेही राजरोसपणे उल्लंघन सुरू आहे. पाटबंधारे विभाग व पोलिसांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

समाजाच्या विघ्नहर्ता स्वरूपाचा अभूतपूर्व जागर; ‘सकाळ’चा उपक्रम

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन तत्कालीन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी 7 जून 2020 रोजी पुणे जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळांसह खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर व इतर धरणे पर्यटनासाठी पूर्णपणे बंद राहतील असा आदेश जारी केला. अद्यापही सदर आदेश लागू आहे. मात्र, सदर आदेशाचा भंग करून अनेक पर्यटक खडकवासला,  सिंहगड व पानशेत या भागांमध्ये पर्यटनासाठी जातात.

पुण्यात पावसाचा जोर ओसरणार; यंदा शहरात ५९४.२ मिलिमीटर पावसाची नोंद

 पानशेत धरणामध्ये पूर्वी बोटींग व्यवसायासाठी परवानगी  होती; परंतु बोटींग दरम्यान अपघात घडून काही पर्यटकांचा पानशेत धरणामध्ये बुडून मृत्यू झाल्यानंतर सदर व्यावसायिकाचा बोटींग परवाना रद्द करण्यात आला होता व बोटी जप्त करण्यात आल्या होत्या. मात्र, तरीही सध्या बेकायदेशीरपणे पानशेत धरणामध्ये बोटींग सुरू असल्याचे दिसून येत आहे. संबंधित व्यावसायिकाला प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभय आहे अशी चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये आहे.

खासगी क्‍लासेसला परवानगी मिळणार; पुणे महापालिका आखणार नवीन नियमावली


       "पोलिस प्रशासनाकडून बोटींगसाठी कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही. बोटींग व्यावसायिक अथवा पर्यटक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. जिल्हाधिकार्‍यांचा आदेश असल्याने पर्यटकांनी पानशेत धरण परिसरात येऊ नये."

-विनायक देवकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक, वेल्हे पोलिस स्टेशन.
 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

   " पाटबंधारे विभागाने बोटींगसाठी कोणताही परवाना दिलेला नाही. संबंधित व्यावसायिकाला अनेक वेळा नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. छुप्या पद्धतीने बोटींग व्यवसाय सुरू असतो."

-सुरेश राऊत, पानशेत धरण शाखा अभियंता.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

"काही शेतकऱ्यांच्या शेतजमिनी धरणाच्या दुसर्‍या बाजूस असल्याने केवळ त्यांनाच बोटीने जाण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. बोटींग व्यवसायाचा परवाना रद्द करण्यात आलेला आहे. कर्मचारी संख्या अपुरी असल्याने कारवाई करण्यास मर्यादा येत आहेत. पोलिस प्रशासनाशी पत्रव्यवहार करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल."

-वामन भालेराव, उपअभियंता, पाटबंधारे विभाग.

loading image