esakal | दिव्यांगांच्या खात्यावर जमा करण्यात आले अर्थसाहाय्य
sakal

बोलून बातमी शोधा

The financial assistance for the month of October has been credited to the account of the disabled

ऐन दिवाळीत 5 हजार 965 पात्र दिव्यांगाना ऑक्‍टोबर महिन्यातील पेन्शन अर्थसहाय्यच्या लाभ त्यांच्या बॅंक खात्यात जमा केला आहे.

दिव्यांगांच्या खात्यावर जमा करण्यात आले अर्थसाहाय्य

sakal_logo
By
आशा साळवी

पिंपरी : महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत अपंग कल्याणकारी योजना राबविण्यात येते. ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर या योजनेअंतर्गत 5 हजार 965 पात्र दिव्यांगांच्या खात्यावर ऑक्‍टोंबर महिन्यातील अर्थसाहाय्य जमा करण्यात आले आहे.

हे ही वाचा : माझे घर, माझी जबाबदारीच्या स्वयंसेवक मानधनाशिवाय

महापालिकेच्या निःसमर्थ अपंग कल्याणकारी योजनेंतर्गत 15 प्रकारच्या योजना राबविल्या जातात. यामध्ये मतिमंद मुले, सांभाळ करणाऱ्या व्यक्तींना वार्षिक 30 हजार रुपये अर्थसाहाय्य, कुष्ठपीडित व्यक्तींना वार्षिक 30 हजार रुपये अर्थसाहाय्य, निःसमर्थ, अपंग, मूकबधिर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अंतर्गत पहिली ते नववीसाठी दहा हजार रुपये, दहावी ते बारावीसाठी 12 हजार रुपये आणि कॉलेजचे पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्यांना 15 हजार रुपये आणि पदवीनंतरच्या शिक्षणासाठी 20 हजार रुपये, डॉ. पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेंतर्गत शाळेत जाऊ न शकणाऱ्या दिव्यांग मुला-मुलींना दरमहा दोन हजार रुपयांचे अर्थसाहाय्य या योजनांचा समावेश आहे.

हे ही वाचा : 'एम.कॉम.' हा पारंपारिक अभ्यासक्रम असल्याने त्यातून उत्तम प्रकारचा रोजगार निर्माण होत नाही, पण याला व्यावसायिक स्वरूप देण्याचा प्रयत्न सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केला आहे

ऐन दिवाळीत 5 हजार 965 पात्र दिव्यांगाना ऑक्‍टोबर महिन्यातील पेन्शन अर्थसहाय्यच्या लाभ त्यांच्या बॅंक खात्यात जमा केला आहे. त्यासाठी एक कोटी 29 लाख 41 हजार 244 रुपयांचा खर्च झाला आहे. याबरोबरच 1 एप्रिल ते 4 नोव्हेंबर अखेर अपंग कल्याणकारी योजनेअंतर्गत एकूण 10 हजार 600 पात्र दिव्यागांना एकूण 13 कोटी 62 लाख 315 रुपयांचे अर्थसाहाय्य वाटप यापूर्वीच करण्यात आल्याची माहिती नागरवस्ती विकास योजनेच्या विभागाचे समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी दिली.

योजनेचे नाव/ लाभार्थी/ एकूण खर्च

- पंडित दीनदयाळ उपाध्याय अपंग पेन्शन अर्थसाहाय्य/3,887/ 77,46,244
- मंतिमंद मुले/व्यक्तींचा सांभाळ करणाऱ्यास अर्थसाहाय्य/1,856/ 46, 4000
- कुष्ठपिडीत व्यक्तींना अर्थसाहाय्य/222 / 5, 55,000
  एकूण/5965/1, 29, 41,244

नागरवस्ती विकास योजनेच्या विभागाचे समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले म्हणाले, महापालिकेच्या कल्याणकारी योजना बाबतची पुरेशी माहिती नसल्याने अनेकजण योजनांच्या लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे कोणताही पात्र लाभार्थी योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी नागरिकांनी सुविधा केंद्रात प्रत्यक्ष संपर्क साधून कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी योजनांची माहिती घ्यावी. 
 
संपादन - सुस्मिता वडतिले