
आरोपीने फिर्यादीशी ओळख वाढवून त्यांच्याशी शारीरिक संबंध केले. त्यावेळी फिर्यादीच्या नकळत काढलेला व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन फिर्यादीला पाच लाख रूपये देण्यास भाग पाडले.
पिंपरी : अश्लील व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी देत महिलेकडून पाच लाख रूपये उकळले. पैसे देण्याचे बंद केल्यानंतर अश्लील व्हिडिओ काही जणांना पाठवून महिलेची बदनामी केल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे.
- होम क्वारंटाईन झाल्यानंतरही अजित पवारांचा कामाचा धडाका सुरूच
अमित मिरसिंग शर्मा (वय 40, रा. मारूंजी) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. आरोपीने फिर्यादीशी ओळख वाढवून त्यांच्याशी शारीरिक संबंध केले. त्यावेळी फिर्यादीच्या नकळत काढलेला व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन फिर्यादीला पाच लाख रूपये देण्यास भाग पाडले.
- बारामती : पोलिसांच्या ताण-तणाव व्यवस्थापनासाठी पोलिस अधीक्षक सरसावले!
फिर्यादीने पैसे देणे बंद केल्यानंतर आरोपीने फिर्यादीच्या जीमेल अकाउंटवर अश्लील मेसेज पाठविले. तसेच फिर्यादीच्या मॅनेजरच्या व्हॉटसऍपवर फिर्यादी व आरोपी यांच्यातील शारीरिक संबंधाचे व्हिडिओ पाठवून फिर्यादीची बदनामी केली. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत.
'ज्यांच्या जावयाने शेतकऱ्यांची जमीन खाल्ली ते दुसऱ्यांच्या जमिनी काय...