Corona Updates : मावळात आज पाच जणांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 1 October 2020

मावळ तालुक्यात गुरुवारी दिवसभरात ७८ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले.

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यात गुरुवारी दिवसभरात ७८ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. कोरोनाबाधित पाच जणांचा मृत्यू झाला. तळेगाव दाभाडे येथील ७३ वर्षीय पुरुष व ५० वर्षीय महिला, लोणावळा येथील ७६ वर्षीय पुरुष, इंदोरी येथील ७२ वर्षीय व सोमाटणे येथील ६६ वर्षीय महिलेचा मृतांमध्ये समावेश आहे. दिलासादायक बाब म्हणजे तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना बरे होणाऱ्यांचे प्रमाण जास्त असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या कमी होत आहे.

पिंपरी-चिंचवडमधील कोविड सेंटर होणार बंद; कारण ऐकून मिळेल दिलासा

तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या चार हजार ७९० झाली आहे. आतापर्यंत १६६ जणांचा मृत्यू झाला आहे. तीन हजार ९८८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. गुरुवारी ८९ जणांना घरी सोडण्यात आले. गुरुवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या ७८ जणांमध्ये तळेगाव दाभाडे येथील सर्वाधिक ३१, लोणावळा येथील २४, सोमाटणे येथील पाच, वडगाव, इंदोरी व तळेगाव दाभाडे ग्रामीण येथील प्रत्येकी तीन, माळवाडी येथील दोन, आंबी, कान्हे, कुसगाव बुद्रुक, शिरे, कुसगाव पमा, नवलाख उंब्रे व टाकवे खुर्द येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे.

आगीनं आमची रोजी रोटीच केली खाक; पिंपरीतील दीडशे महिलांचा आक्रोश

तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या चार हजार ७९० झाली असून, त्यात शहरी भागातील दोन हजार ७९३ व ग्रामीण भागातील एक हजार ९९७ जणांचा समावेश आहे. तळेगावात सर्वाधिक एक हजार ४५६, लोणावळा येथे एक हजार ५० व वडगाव येथे रुग्णसंख्या २८७ झाली आहे. आतापर्यंत १६६ जणांचा मृत्यू झाला आहे. तीन हजार ९८८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. गुरुवारी ८९ जणांना घरी सोडण्यात आले. 

निवृत्त झालेल्या ड्रायव्हर काकांसाठी अतिरिक्त आयुक्त स्वत: बनले ड्रायव्हर

सध्या तालुक्यात ६३६ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील ४३२ लक्षणे असलेले व २०४ लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. लक्षणे असलेल्या ४३२ जणांमध्ये ३४५ जणांमध्ये सौम्य, तसेच ८१ जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. सहा जण गंभीर आहेत. सध्या सक्रिय असलेल्या ६३६  रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू असल्याची मावळ तालुका कोविड कक्षाचे समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: five people death due to corona in maval thursday 1 october 2020