...म्हणून टोळीला पडले 'रावण साम्राज्य' नाव

Gangs are named on Leader of the group in Pimpri chinchwad
Gangs are named on Leader of the group in Pimpri chinchwad
Updated on

पिंपरी : अमुक टोळीचा राडा, त्या टोळीतील सराईत गुन्हेगार जेरबंद, टोळीने माजविली दहशत, टोळीयुद्धातून एकाचा खून अशा घटना नेहमी कानावर पडत असतात. दहशत माजवीत परिसरात वर्चस्व निर्माण करण्यासाठी टोळक्‍यांकडून वारंवार गंभीर गुन्हे करून टोळी निर्माण केली जाते. टोळीचा दबदबा निर्माण झाल्यानंतर एखाद्या नावाने टोळी चालविली जाते. टोळीच्या म्होरक्‍याच्या नावाने अथवा एखाद्या प्रसंगावरून टोळीला नाव पडते. अन्‌ येथेच टोळीच्या नावाचे बारसे होते. यासह गुन्हेगारी क्षेत्राशी निगडित असलेल्या तरूणांना आकर्षित वाटेल अशीही नावे दिली जात असल्याचे समोर येते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
  क्लिक करा

अल्पवयातच शिक्षण सोडून कुठेतरी छोटी-मोठी चोरी अथवा हुल्लडबाजी करून गुन्हेगारीकडे वळालेली मुले नंतर सराईत गुन्हेगार होतात. हाणामारी, वाहनांची तोडफोड, दमदाटी, रॅश ड्रायव्हिंग करीत परिसरात दहशत निर्माण करून काही युवक वेगळ्या मार्गाने चमकायला पाहतात. दरम्यान, एक-दोन गुन्हे केल्यानंतर गुन्हेगारीचे आकर्षण असणारी इतरही मुले अशा युवकांना जोडली जातात. संगनमताने गुन्हे केल्यानंतर येथेच टोळी उदयाला येते. पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागात अनेक गुन्हेगारी टोळ्या होत्या व अद्यापही आहेत. या टोळ्यांनी खून, खुनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड करण्यासह अनेकदा धूडगूस घालत सार्वजनिक शांततेचा भंग केला आहे. 

तीस दिवसांच्या बाळाची झुंज यशस्वी; ससूनमध्ये उपचार
 

आकुर्डी परिसरातील सोन्या काळभोर, रावण साम्राज्य, बॉबी यादव, आक्‍या बॉन्ड टोळी तर भोसरी परिसरात गोट्या धावडे, देहूरोड परिसरात महाकाली या टोळ्या नेहमीच चर्चेत असतात. या टोळ्यांनी अनेकदा पिंपरी-चिंचवडसह परिसरात धूडगूस घातला. या टोळीच्या म्होरक्‍यासह त्यातील सदस्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. टोळ्यांचा बिमोड करण्यासाठी पोलिसांनी यातील गुन्हेगारांना तडीपार करण्यासह मोक्काचीही कारवाई केली. यामुळे काही टोळ्यांचा उपद्रव कमी झाला. मात्र, काही टोळ्या व त्यातील सदस्य अद्यापही "ऍक्‍टीव्ह' आहेत. यामुळे पुन्हा पुन्हा शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होतो. 

आंबेगाव तालुक्यातील 'या' भागात सापडले 2 कोरोना पॉझिटिव्ह

या टोळ्यांची नावे त्यातील म्होरक्‍यांच्या नावावरूनच पडलेली आहे. देहूरोड परिसरातील महाकाली टोळीने 2002 ते 10 या कालावधीत अक्षरश: धुमाकूळ घातला होता. दरम्यान, पुणे ग्रामीण पोलिसांनी या टोळीचा म्होरक्‍या असलेल्या महाकाली उर्फ राकेश ढकोलिया याचा डिसेंबर 2011 मध्ये आकुर्डीतील रमाबाईनगर परिसरात एन्काऊंटर केला. त्यानंतर ही टोळी त्याचा भाऊ मनोज उर्फ डिंगऱ्या ढकोलिया चालवीत होता. मात्र, त्याचाही दोन महिन्यांपूर्वी वाल्हेकरवाडी येथे खून झाला. 
भोसरीतील गोट्या धावडे टोळीनेही भोसरी परिसरात दहशत निर्माण केली होती. या टोळीचा म्होरक्‍या असलेल्या सचिन उर्फ गोट्या धावडे याने भाजपच्या एका बड्या नेत्याचा खून केला. यामुळे भोसरीत अनेक दिवस तणावपूर्ण वातावरण होते. दरम्यान, गोट्या धावडे याचाही डिसेंबर 2012 मध्ये खून झाला. त्यानंतर ही टोळीही विस्कटली. 
आकुर्डीतील सोन्या काळभोर टोळीनेही निगडी, आकुर्डीसह परिसरात मोठ्याप्रमाणात उपद्रव केला. या टोळीचा म्होरक्‍या सोन्या काळभोर असून काही दिवसांच्या अंतराने या टोळीचा काही ना काही उद्योग सुरूच असतो. तसेच आक्‍या बॉन्ड टोळीनेही उच्छाद मांडला आहे. मागील महिन्यात चिखली परिसरात टोळीयुद्धातून आक्‍या बॉण्ड टोळीतील एका सराईत गुन्हेगाराचा खून झाल्याची घटना घडली. यामुळे दहशत माजविण्याच्या उद्देशाने टोळक्‍याकडून दुसऱ्या दिवशी परिसरातील वाहनांची तोडफोडही करण्यात आली. 

मुलाच्या डोळ्यांदेखत आईची आत्महत्या; रुग्णालयातील खिडकीतून टाकली उडी 

चित्रपटांचा प्रभाव 
अनेक गुन्हेगारी टोळ्यांवर चित्रपटांचा प्रभाव असल्याचे दिसून येते. चित्रपटात दाखविल्याप्रमाणे काही जणांना एकत्र घेऊन टोळी तयार करून गुंडगिरी केली जाते. चित्रपटांच्या गाण्यांच्या आधारावर टोळीतील सदस्यांची गाणी, व्हिडिओ तयार करून समोरील टोळीवर वर्चस्व दाखविण्यासह आपले अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न केला जातो. 
कडुलिंबातील रसायनामुळे अल्झायमरला वेसण; एनसीएलमध्ये संशोधन

रावणाचे पुस्तक वाचून टोळीला दिले 'रावण साम्राज्य' नाव 
आकुर्डी परिसरातील एका टोळीतील आरोपी कारागृहात असताना रावणावर आधारित पुस्तक वाचायचा. त्यामुळे रावण नाव त्याच्या डोक्यात बसले. वारंवार रावणाची चर्चा होऊ लागली यातूनच त्यांच्या टोळीला 'रावण साम्राज्य' नाव दिले गेले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com