प्रभारी अतिरिक्त आयुक्तांच्या हाती आली निम्मी पिंपरी-चिंचवड महापालिका 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 28 October 2020

महापालिकेतील प्रभारी अतिरिक्त आयुक्त (दोन) अजित पवार पालिकेचे फुल कारभारी झाले आहेत. निविदा काढला जाणारा मध्यवर्ती भांडार विभाग, आरोग्य असे अगोदरच विभाग असताना आता महत्वाचा पाणीपुरवठा विभाग, बांधकाम नियंत्रण विभागही त्यांच्याकडे सोपविला आहे. आता एकूण 14 विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे आली आहे.

पिंपरी - महापालिकेतील प्रभारी अतिरिक्त आयुक्त (दोन) अजित पवार पालिकेचे फुल कारभारी झाले आहेत. निविदा काढला जाणारा मध्यवर्ती भांडार विभाग, आरोग्य असे अगोदरच विभाग असताना आता महत्वाचा पाणीपुरवठा विभाग, बांधकाम नियंत्रण विभागही त्यांच्याकडे सोपविला आहे. आता एकूण 14 विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे आली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिकेचा "ब' वर्गात समावेश करण्यात आल्याने तीन अतिरिक्त आयुक्तांची पदे निर्माण झाली आहेत. त्यात दोन राज्य सेवेतील आणि एक पालिका सेवेतील आहेत. राज्य सेवेतील संतोष पाटील एक नंबरचे अतिरिक्त आयुक्त आहेत. तर, पुणे विभागीय जात पडताळणी समितीची जबाबदारी असलेले पवार यांच्याकडे 26 जुलै 2019 पासून पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाचा "अतिरिक्त पदभार'आहे. वर्षभरापासून त्यांच्याकडे पालिकेत अतिरिक्त जबाबदारी आहे. त्यांची मूळ आस्थापना जात पडताळणी विभागात आहे. त्यांचे वेतनही राज्य सरकारमार्फत होते.

कोरोनामुक्तांसाठी दिलासादायक बातमी; आता पिंपरीमध्ये सुरू होणार कोविड पश्‍चात उपचार केंद्र

पवार यांच्याकडे "अतिरिक्त' जबाबदारी असतानाही त्यांच्याकडे पालिकेतील महत्वाचे विभाग दिले आहेत. त्यांच्याकडे मध्यवर्ती भांडार विभाग, आरोग्य असे मलईदार विभाग होते. आता कोट्यवधी रुपयांच्या निविदा काढल्या जात असताना महत्वाचा पाणीपुरवठा व जल:निस्सारण विभाग, बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण, पर्यावरण अभियांत्रिकी असे महत्वाचे विभाग दिले आहेत, असा आरोप सत्ताधाऱ्यांसह विरोधक करत आहेत. पवार यांची कार्यपद्धती वादग्रस्त राहिली आहे. 

खासगी बॅंकांचे ढिसाळ नियोजन; पिंपरीतील खातेदारांचे हाल

पवार यांच्याकडे आलेले विभाग 
पाणीपुरवठा व जल:निस्सारण विभाग, बांधकाम परवानगी,अतिक्रमण मुख्य कार्यालय (अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण नियंत्रण व निर्मुलन विभाग), पर्यावरण अभियांत्रिकी, मध्यवर्ती भांडार विभाग, आरोग्य विभाग, पशुवैद्यकीय, कर आकारणी व करसंकलन विभाग, आकाशचिन्ह व परवाना विभाग, स्थानिक संस्था कर, भूमी आणि जिंदगी, सर्व क्षेत्रीय कार्यालये, क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणारे सर्व विभाग (सार्वजनिक वाचनालय, प्रेक्षागृहासह), निवडणूक जनगणना (आधारसह), सभाशाखा असे महत्वाचे 14 विभाग त्यांच्याकडे दिले आहेत.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Half Pimpri Chinchwad Municipal Corporation came in the hands of Additional Commissioner in charge