esakal | बेघरांनी पिंपरी चिंचवडमध्ये निवाऱ्यासाठी टर्मिनल्स केले काबीज
sakal

बोलून बातमी शोधा

BRTS-Stop

पोटासाठी गावाकडून शहरात येऊन काहीतरी वस्तू विकायच्या अन्यथा भीक मागून खायचं. रस्ता हेच त्यांचं घर आणि तिथंच उघड्यावर त्यांनी मांडलेला संसार. सध्या हे दृश्‍य सर्रास पिंपरी-चिंचवड शहरात ठिकठिकाणी दिसू लागलंय. याचं प्रातिनिधिक चित्र निगडी येथील भक्ती-शक्ती चौकातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे टर्मिनल्स बीआरटीएस स्थानकात पाहायला मिळाले. इकडे अनेक बेघरांनी आपला निवारा तयार केला असून, टर्मिनल्स काबीज केला आहे.

बेघरांनी पिंपरी चिंचवडमध्ये निवाऱ्यासाठी टर्मिनल्स केले काबीज

sakal_logo
By
आशा साळवी

पिंपरी - पोटासाठी गावाकडून शहरात येऊन काहीतरी वस्तू विकायच्या अन्यथा भीक मागून खायचं. रस्ता हेच त्यांचं घर आणि तिथंच उघड्यावर त्यांनी मांडलेला संसार. सध्या हे दृश्‍य सर्रास पिंपरी-चिंचवड शहरात ठिकठिकाणी दिसू लागलंय. याचं प्रातिनिधिक चित्र निगडी येथील भक्ती-शक्ती चौकातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे टर्मिनल्स बीआरटीएस स्थानकात पाहायला मिळाले. इकडे अनेक बेघरांनी आपला निवारा तयार केला असून, टर्मिनल्स काबीज केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"स्मार्ट सिटी'कडे वाटचाल करणाऱ्या शहराला स्थलांतरित अन्‌ बेघरांचा विळखा पडला आहे. वेगाने विकसित होणाऱ्या पिंपरी- चिंचवडलाही स्थलांतरित गरिबांचे प्रमाण वाढते आहे. गेल्या वर्षापासून निगडी भक्ती-शक्ती चौकात 50 ते 70 जण वास्तव्याला आहेत. एकेका कुटुंबात तीन-चार लोक राहतात. तिथे अनेकांनी चुली मांडल्या आहेत. अंथरूण, कपड्यांचे बोचकी, पुरेसे कपडे नसलेले त्यांची मुले, दहा-बारा भांडी एवढाच त्यांचा संसार.

नदीत बुडून पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू

आसपासच्या परिसरातून मागून पाणी आणायचे, चुलीवर काहीतरी अन्न शिजवायचे व पोटाची भूक भागवायची, लेकरांना जमले तर तिथेच अंघोळ घालतात. वापरलेले पाणी, कचरा, खरकटे सर्व काही तेथेच टाकले जाते. त्यातून बीआरटी बसथांबा परिसर अस्वच्छ झाला आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढत असून, दुर्गंधी पसरत आहे. तसेच याठिकाणी रात्रीच्यावेळी गाड्या पार्क केल्या जातात. देहूरोडच्या दिशेने जाणाऱ्या वाहनाखाली एखादे मूल खेळताना वाहनाखाली येऊन अपघात होण्याची शक्‍यता आहे.

रस्त्याने चालणंही धोक्याचं? कोयत्याचा धाक दाखवून लुटला ऐवज

प्रशासनाचे दुर्लक्ष
यमुनानगरमधील सतीश मरळ यांनी वैतागून गेल्या वर्षी "श्रावण हर्डीकरनगर' नावाचा फलक लावला. त्यानंतर महापालिका प्रशासनाला जाग येऊन त्यांनी निगडी उड्डाणपूल भिकारीमुक्त केला होता. त्या लोकांनी आता वरच्या बाजूला आपला मोर्चा वळविला आहे. पीएमपीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना व पीएमपीच्या चालक, वाहक यांनीही बीआरटी बसस्टॉपवरील दुर्गंधी व भिकाऱ्यांचा त्रास असह्य होत असल्याबाबत पीएमपी निगडी आगार तसेच, अनेकांनी महापालिकेकडे लेखी तक्रारी केल्या होत्या. मात्र, प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नाही. हे कुटुंबीय परराज्यांतील असून, उदरनिर्वाहाकरिता ते चौकात विविध वस्तू विक्री करतात. त्यांना निवारा मिळाला असला, तरी त्यांच्याकडून होणाऱ्या अस्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नये, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

"मी इथला भाई आहे' अशी धमकी देत मागितली खंडणी 

याठिकाणीही वास्तव्य
चिंचवड स्टेशन परिसरात गरिबांचे वास्तव्य रस्त्यावरच आहे. चिंचवड स्टेशन व मोरवाडी चौकात स्थलांतरित गरिबांची कुटुंबे खेळणी व काही वस्तू विकून उदरनिर्वाह करतात. महिला मुलाला कडेवर घेऊन लोकांकडे पैसे मागतात. आकुर्डी चौकात विकलांग व्यक्ती, लहान मुले रहदारीला न जुमानता पैसे मागतात. मासुळकर कॉलनीतील एच. ए. मैदानावरही काहींनी बस्तान मांडले आहे. पुणे महापालिकेने अशा कुटुंबांसाठी निवाऱ्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यातून त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्‍न सुटला असून, अस्वच्छतेची समस्याही सुटली आहे. परंतु, पिंपरी-चिंचवडमध्ये अद्याप अशी सोय झाली नसल्याने ठिकठिकाणी अशी कुटुंबे पाहायला मिळत आहेत. परिणामी अस्वच्छतेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

Edited By - Prashant Patil