तब्बल २ वर्षानंतर महापालिकेने दिले मानधन तरी, बचत गट चालक हवालदिल

PCMC
PCMC
Updated on

पिंपरी - महापालिकेच्या शिक्षण विभागाने तब्बल दोन वर्षानंतर पोषण आहार मध्ये काम करणाऱ्या बचत गटांचे स्वयंपाकी व मदतनीस यांच्या मानधनाचे पैसे दिले. मात्र, अद्याप फरकाची रक्कम मिळाली नसल्याचे बचत गट चालक हवालदिल झाले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

केंद्र सरकारकडून शालेय पोषण आहार योजना राबविली जाते. पिंपरी चिंचवड शहरात 11 पुरवठा धारकामार्फत सेंट्रल किचन सुविधा केली आहे. महापालिका व खासगी अनुदानित शाळांमधील पहिली ते पाचवी (प्राथमिक) आणि इयत्ता 6 ते 8 वी (उच्च प्राथमिक) सुमारे एक लाख विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविण्यात येतो. मात्र, महापालिकेच्या शालेय शिक्षण विभागाने दोन वर्षांपासून शालेय पोषण आहारामध्ये काम करणाऱ्या बचत गटांचे स्वयंपाकी व मदतनीस याचे मानधनाचे पैसे दिले नव्हते. या प्रकारामुळे शिक्षण विभागाचा नियोजन शून्य कारभार सुरू असल्याची तक्रार शिवसेनेच्या विभाग संघटिका मंदा फड यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेत आयुक्त हर्डीकर यांनी या विभागाला सूचना दिल्यावर दोन वर्षानंतर बचत गटाच्या मदतनीस आणि स्वयंपाकी यांना मानधन मिळाले. 

फड म्हणाल्या, 'शिक्षण विभागाने बचत गटांकडून जी काही कागदपत्रे मागवली ती वेळोवेळी विभागाला पुरवण्यात आली आहेत. गेल्यावर्षी केंद्रीय किचन प्रणालीच्या चुकीच्या निविदा प्रक्रियेमुळे सगळ्या बचत गटातील महिलांचे कंबरडे मोडले आहे. बचत गट चालक हक्काचे पैसे कधी येतील, याचीच वाट पाहत होते.'' 

फरकाची रक्कम मिळेना 
एप्रिल 2018 पासून फरकाची रक्कम भेटणार होती, पण ती रक्कम ही शिक्षण विभागाने राज्य शासनाकडे व्यवस्थित पाठपुरावा न केल्यामुळे अडकून पडली आहे. ऑनलाइन पेमेंट प्रणाली सुरू झाल्यापासून शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकांच्या खात्यावर पैसे जमा होतात. परंतु त्या रकमेमध्ये ही बराच फरक दिसून येत आहे. त्या बाबतची शिक्षण विभागाकडे काहीच माहीत नाही. त्यामुळे अद्याप फरक मिळालेला नाही. '' 

आकडे बोलतात 

  • विद्यार्थी संख्या - एक लाख 
  • स्वयंपाकी व मदतनीस मानधन : 1 हजार 500 
  • बचत गट व संस्था - 11 

'सरकारकडून मानधनाचे पैसे आल्यावरच वाटप केले आहे. यामध्ये या अगोदरच्या 38 पुरवठाधारकांच्या मानधन मिळाले आहे. '' 
- सचिन देशमुख, समन्वयक, शालेय पोषण आहार महापालिका

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com