esakal | Video : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आवाहनानंतरही नागरिकांकडून मूर्ती विसर्जनाचा 'घाट' 
sakal

बोलून बातमी शोधा

Video : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आवाहनानंतरही नागरिकांकडून मूर्ती विसर्जनाचा 'घाट' 
  • भाविकांकडून पाय वाटेने जाऊन विसर्जन 

Video : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आवाहनानंतरही नागरिकांकडून मूर्ती विसर्जनाचा 'घाट' 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : 'कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नदीपात्रात, घाटांवर, हौदात गणेश मूर्ती विसर्जन करण्यास बंदी करण्यात आलेली आहे,' अशा आशयाचे फलक लावून महापालिकेने शहरातील तिन्ही नद्यांचे घाट पत्रे लावून बंद केले आहेत. त्यामुळे पीओपीच्या मूर्ती असलेल्या भाविकांनी पाय वाटेने व पत्रे लावलेल्या ठिकाणी कडेकडेने जाऊन नदी पात्र गाठत दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन केले. तर शाडू मातीच्या मूर्ती असलेल्या भाविकांनी घरातच बादली व टपात विसर्जन करून पाणी झाडांना घातले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरातून मुळा, पवना व इंद्रायणी नद्या वाहतात. त्यांच्या काठांवर महापालिकेने गणेशमूर्ती विसर्जन घाट बनविलेले आहेत. परंतु, प्रदूषण रोखण्यासाठी गेल्या पाच-सहा वर्षांपासून घाटांवर हौद बांधून त्यात मूर्ती विसर्जन करण्याचे आवाहन केले जात होते. काही पर्यावरणप्रेमी संस्था, संघटनांकडून मूर्ती दान उपक्रमही राबविला जात होता. मात्र, यंदा कोरोनामुळे सर्व नदी घाट, हौद, तलाव, विहिरींमध्ये विसर्जन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. चिंचवड थेरगाव पूल, मोरया घाट, प्राधिकरणातील गणेश तलाव येथील प्रवेशद्वार बंद केले आहेत. अन्य ठिकाणचे घाट पत्रे लावून बंद केले असून मूर्ती विसर्जन न करण्याबाबतचे फलक लावले आहेत. त्यामुळे दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी गेलेल्या भाविकांची गैरसोय झाली. मात्र, पायवाटेचा मार्ग काढत त्यांनी नदीपात्र गाठले आणि विसर्जन केले. 

पिंपरी-चिंचवडमध्ये शालेय साहित्य खरेदीसाठी इंग्रजी शाळांची अशी 'दुकानदारी'

'गौरी'ला यंदा सखींचा गोतावळा नाहीच!

येथे आहेत घाट 

शहरातील पवना, मुळा व इंद्रायणी नद्यांवर साधारणतः 34 घाट आहेत. पवना नदीवर रावेत, पुनावळे, वाल्हेकरवाडी, चिंचवड, थेरगाव, काळेवाडी, पिंपरी, रहाटणी, पिंपळे सौदागर, कासारवाडी, पिंपळे गुरव, नवी सांगवी, दापोडी, जुनी सांगवी; इंद्रायणी नदीवर चिखली, मोशी, डुडुळगाव, चऱ्होली आणि मुळा नदीवर वाकड, पिंपळे निलख, जुनी सांगवी, दापोडी आदी ठिकाणी नदी घाट आहेत. निगडी-प्राधिकरणातील गणेश तलाव आणि शहरातील जुन्या विहिरींमध्ये मूर्तींचे विसर्जन केले जाते. या सर्व ठिकाणी मनाई करण्यात आली आहे. 

भाविक म्हणतात... 

घरीच विसर्जन करून लावली तुळस 

नीता हिरवे, चिंचवड : आमच्या घरी दरवर्षी शाडू मातीची मूर्ती असते. दीड दिवसाच्या गणपतीचे मोरया घाटावर पवना नदीत विसर्जित करायचो. मात्र, यंदा प्रशासनाने आवाहन केल्यामुळे घरातच विसर्जन करण्याचा निर्णय घेतला होता. शिवाय, मूर्ती विक्रेत्याने मूर्तीसोबतच मोठी कुंडी व तुळशीचे रोप दिले होते. कुंडीत पाणी घेऊन त्यात मूर्ती विसर्जित करायची व तुळशी रोप लावायचे, असे आवाहन त्यांनी केले होते. त्यामुळे घराच्या टेरेसवरच आम्ही कुंडीत विसर्जन करून तुळस लावली. येथून पुढे दरवर्षी असेच करणार आहे. शिवाय, प्रायवायू देणाऱ्या तुळशींची संख्याही वाढणार आहे. 

हौदांची व्यवस्था हवी होती 

श्रीकृष्ण बारी, रावेत : पवना नदीवर घाटावर पत्रे लावलेले आहेत. त्यामुळे नदी घाटावर भाविकांना मूर्ती विसर्जनासाठी जाता येत नाही. शाडूच्या मूर्ती घरातच विसर्जित करता येतील. परंतु, पीओपीच्या मूर्ती विरघळत नाहीत, त्या घरात कशा विसर्जित कराव्यात, हा पेच निर्माण झालेला आहे. पीओपीमुळे जलप्रदूषण वाढतेय, हे बरोबर आहे, पण, या मूर्ती बाजारात मिळाल्याने भाविकांनी घेतल्या. त्यांच्या विक्रीसही प्रशासनाने परवानगी दिली. आता म्हणताय, घरातच विसर्जित करा. कसे करणार. किमान हौदांची तरी व्यवस्था प्रशासनाने करायला हवी होती. 
 

loading image
go to top