पिंपरी-चिंचवड : पोलिसांवरच्या हल्ल्यांमध्ये वाढ; वर्षभरात 36 घटनांची नोंद

मंगेश पांडे
Monday, 30 November 2020

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांनाच काही मुजोर नागरिक "टार्गेट' करीत असल्याचे दिसून येत आहे. कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना अरेरावीची भाषा करीत त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यापर्यंत काही जणांची मजल गेली आहे. या वर्षात पिंपरी-चिंचवड शहरात पोलिसांवरील हल्ल्याच्या तब्बल 36 घटनांची नोंद झाली आहे.

पिंपरी - नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांनाच काही मुजोर नागरिक "टार्गेट' करीत असल्याचे दिसून येत आहे. कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना अरेरावीची भाषा करीत त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यापर्यंत काही जणांची मजल गेली आहे. या वर्षात पिंपरी-चिंचवड शहरात पोलिसांवरील हल्ल्याच्या तब्बल 36 घटनांची नोंद झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गुन्हेगारी रोखण्यासह कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिस प्रशासन चोवीस तास सज्ज असते. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र, कारवाईदरम्यान कायदा मोडणारेच काही मुजोर नागरिक पोलिसांशी हुज्जत घालतात. स्वत:ची चूक असल्याचे भानही त्यांना राहत नाही. पोलिसांच्या अंगावर धावून जात हात उचलण्यासही ते धजावतात, धमकीही देतात. अशाप्रकारच्या वाढत्या घटनांमुळे पोलिसांशीच सुरक्षितता धोक्‍यात आल्याचे दिसून येते. 

पिंपरी-चिंचवड शहरात दोन जणांचा मृत्यू; तर 172 नवीन रुग्ण 

चिंचवडगावात 5 नोव्हेंबर रोजी वाहतूक पोलिस विनामास्क जाणाऱ्या वाहनचालकावर कारवाई करण्यासाठी गेले असता, वाहनचालकाने पोलिसाला मोटारीच्या बोनेटवरून तब्बल एक किलोमीटरपर्यंत फरफटत नेत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकाराबाबत विविध स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला. तसेच, भोसरीत रेकॉर्डवरील आरोपीचा शोध घेण्यासाठी आरोपीच्या घरी आलेल्या पोलिसांबरोबर आरोपीच्या वडिलांनी हुज्जत घातली. अंगावर धावून जात "मी पोलिसांना जुमानत नाही, मी ह्यूमन राइट्‌सचा कार्यकर्ता आहे, माझ्या मुलाला कोण अटक करतो बघतोच मी' अशी धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता पोलिस अंमलदाराची गचांडी पकडून त्यांना ढकलून दिले. 

विधान परिषद मतदानासाठी पिंपरी-चिंचवड शहरात पदवीधरांसाठी 43, शिक्षकांसाठी 9 मतदान केंद्र

22 नोव्हेंबरला पिंपरीतील निराधारनगर येथील दारू अड्ड्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांशी दारूविक्रेत्याने हुज्जत घालत झटापट केली. "मी एकटाच दारूधंदा करतो का, बऱ्या बोलाने सोडा नाहीतर याचे परिणाम वाईट होतील', अशी धमकी त्याने पोलिसांना दिली. अशाचप्रकारे पोलिसांना मारहाण करण्यासह थेट जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. यामुळे शहरात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी असणारे पोलिसच सुरक्षित नसल्याचे दिसून येते. चालू वर्षाच्या अकरा महिन्यांत पोलिसांवरील हल्ल्याच्या तब्बल 36 घटना घडल्या. यामध्ये मार्च व ऑक्‍टोबर महिन्यात सर्वाधिक प्रत्येकी घटनांची नोंद झाली. 

पोलिसांवरील हल्ल्याच्या घटना 
महिना घटना 

जानेवारी 2 
फेब्रुवारी 4 
मार्च 5 
एप्रिल 4 
मे 4 
जून 4 
जुलै 1 
ऑगस्ट 2 
सप्टेंबर 2 
ऑक्‍टोबर 5 
नोव्हेंबर 3 
एकूण 36

Edited By - Prashant Patil

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increase in attacks on police recorded 36 incidents during the year