वाढीव खर्च मंजुरीची चौकशी करा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 January 2021

महापालिकेत सत्ता नव्हती, त्यावेळी आयत्या वेळचे विषय व वाढीव खर्चास भाजपचा विरोध असायचा, आता तेच मान्यता देत आहेत. त्यावेळचे सत्ताधारी व विद्यमान विरोधक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह शिवसेनाही गप्प असून अशा कामांना मुकसंमती देत आहे.

पिंपरी : महापालिकेच्या स्थायी समिती सभेने 23 व 30 डिसेंबरच्या बैठकीत 30 कोटी रुपयांच्या वाढीव खर्चास मंजुरी दिली आहे. या निर्णयाला स्थगिती देऊन चौकशी करावी व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

महापालिकेत सत्ता नव्हती, त्यावेळी आयत्या वेळचे विषय व वाढीव खर्चास भाजपचा विरोध असायचा, आता तेच मान्यता देत आहेत. त्यावेळचे सत्ताधारी व विद्यमान विरोधक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह शिवसेनाही गप्प असून अशा कामांना मुकसंमती देत आहे. अशाप्रकारे ऐन वेळच्या कोट्यवधी रुपयांच्या वाढीव खर्चाला मंजुरी म्हणजे करदात्यांच्या तिजोरीवर संगनमताने टाकलेला दरोडाच म्हणावा लागेल. त्यामुळे या सर्व विषयांना स्थगिती देऊन अंदाजित खर्च निश्‍चित करणारे अधिकारी, पदाधिकाऱ्यांची चौकशी करावी. दोषींवर कठोर कारवाई करावी, असेही भापकर यांनी निवेदनात म्हटले आहे.

लातूर जिल्ह्यातील शेकडो कोंबड्या कशामुळे मृत पावल्या? परिसरात भीती

वाढीव खर्चाचे मंजूर विषय
- थेरगाव बापूजी बुवानगरमधील रुग्णालयाच्या कामासाठी आयत्या वेळी 14 कोटी 30 लाख
- बिजलीनगर- गुरुद्वारा रस्त्यावरील भुयारी मार्गासाठी चार कोटी 50 लाख रुपये
- भोसरीतील चर बुजवण्याच्या कामात सीडी वर्कसाठी (नाल्यावर स्लॅब टाकणे) सात कोटी 50 लाख
- महापालिका कार्यशाळा विभागातील कामांसाठी दोन कोटी 10 लाख रुपये
- दफनभूमीसाठी काळजी वाहक पुरवण्यासाठी 30 लाख 16 हजार रुपये
- औंध-रावेत बीआरटीएस मार्गावर पार्क स्टीटसमोर बांधण्यात येणाऱ्या सब-वेसाठी 96 लाख 97 हजार

 

अर्ध्यावरती डाव मोडला... अपघातात पतीचा मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inquire about increased cost approval

टॉपिकस