पिंपरीत 30 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 November 2020

एकाच अनेक दिवसांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून असलेल्या तसेच वादात अडकलेल्या निरीक्षकांचा समावेश

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलिस दलातील 30 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. यामध्ये एकाच अनेक दिवसांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून असलेल्या तसेच वादात अडकलेल्या निरीक्षकांचा समावेश आहे. 

'चला मावळे घेऊन येऊ'; किल्ल्यांच्या चित्र खरेदीसाठी बालगोपाळात रमले खासदार!​

नाव व कंसात सध्याची नेमणूक - नवीन नेमणुकीचे ठिकाण पुढीलप्रमाणे : सुधीर अस्पत (खंडणी व दरोडा विरोधी पथक-भोसरी वाहतूक विभाग), उत्तम तांगडे (गुन्हे शाखा युनिट 1- खंडणी विरोधी पथक), भास्कर जाधव (नियंत्रण कक्ष- दरोडा विरोधी पथक), रामदास इंगवले(नियंत्रण कक्ष-गुन्हे शाखा युनिट 5), संजय तुंगार (नियंत्रण कक्ष-सायबर शाखा), बालाजी सोनटक्के (म्हाळुंगे चौकी-गुन्हे शाखा युनिट 1), विठ्ठल कुबडे (चाकण वाहतूक विभाग-सामाजिक सुरक्षा पथक), शिवाजी गवारे (भोसरी वाहतूक विभाग-भोसरी एमआयडीसी पोलिस ठाणे), ज्ञानेश्वर साबळे (नियंत्रण कक्ष-आळंदी पोलिस ठाणे), बाळकृष्ण सावंत (गुन्हे शाखा युनिट 5- हिंजवडी पोलिस ठाणे), मोहन शिंदे (युनिट 4 -दिघी पोलीस ठाणे), सुधाकर काटे (सायबर शाखा-चिंचवड पोलिस ठाणे), प्रकाश जाधव (आळंदी पोलिस ठाणे -दिघी पोलिस ठाणे), राजेंद्र कुंटे (भोसरी एमआयडीसी पोलीस ठाणे-पिंपरी वाहतूक विभाग), प्रसाद गोकुळे (विशेष शाखा -गुन्हे युनिट 4), विवेक लावंड (दिघी पोलिस ठाणे- कल्याण शाखा), रवींद्र चौधर (आळंदी पोलिस ठाणे-विशेष शाखा) आदी पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे.

बावीस वर्षांपासून राजगडावर वसुबारस साजरा करणारे केशव आरगडे​ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Internal transfers of 30 police inspectors in Pimpri