
पिंपरी : प्राणघातक हल्ल्याच्या गंभीर गुन्ह्यातील सराईत गुंडाला पाठीशी घालणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकास निलंबित केले आहे. सचिन चव्हाण असे त्यांचे नाव आहे. काळेवाडी पोलिस ठाण्यात ते नेमणुकीस होते. काळेवाडीतील पवनानगर येथे तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार रविवारी (ता. २२) घडला होता. याप्रकरणात अनुप भोसले याला अटक झाली आहे.