Video : अडीच महिन्यानंतर फुले उमलली, मात्र लॉकडाऊनमुळे पन्नास हजारांची रोपटी कोमेजली

रमेश मोरे 
सोमवार, 1 जून 2020

कोरोना महामारीच्या संकटात उद्योग व्यवसायाची घडी विस्कळीत झाली असून यातून छोटे रस्त्यावरील व्यावसायिक पुरते भरडले गेले आहेत. जुनी सांगवी,नवी सांगवीच्या मध्यावर पत्राशेड वजा असलेल्या भाड्याच्या दुकानातून चालविण्यात येत असलेल्या फुलझाडे विक्रेत्याला लॉकडाऊनची मोठी झळ सोसावी लागली आहे.

जुनी सांगवी - कोरोना महामारीच्या संकटात उद्योग व्यवसायाची घडी विस्कळीत झाली असून यातून छोटे रस्त्यावरील व्यावसायिक पुरते भरडले गेले आहेत. जुनी सांगवी,नवी सांगवीच्या मध्यावर पत्राशेड वजा असलेल्या भाड्याच्या दुकानातून चालविण्यात येत असलेल्या फुलझाडे विक्रेत्याला लॉकडाऊनची मोठी झळ सोसावी लागली आहे. तीव्र उन्हाळा त्यात लॉकडाऊनमुळे दुकानाबाहेर झाकून ठेवलेली पन्नास हजार रूपये किमतीची फुलझाडे देखभाल व पाण्याविना सुकून गेल्याने फेकावी लागल्याने येथील सुनिलकुमार महातो या फुलझाडे विक्रेत्याला आर्थिक झळ सोसावी लागत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अडीच महिन्याच्या लॉकडाऊन काळात देखभाल करता आली नसल्याने दुकानातील गुलाब, जास्वंद, जाईजुई, रातराणी, सोनचाफा, अनंता, पारिजातक, तुळस, बोनवेल, कडीपत्ता, पपई, चिकू, निंबू, पिंपळ, नारळ, बदाम, आंबा, सिताफळ अशा नानाविध प्रकारची फुले व मोठ्या फळझाडांच्या रोपट्यांचे नुकसान झाले.

अडीच महिन्यानंतर नियम शिथिल झाल्यावर या विक्रेत्याच्या दुकानातील फुलझाडे उमलू लागली असली तरी झालेला आर्थिक भुर्दंड कसा भरून निघणार असा प्रश्न या विक्रेत्याला पडला आहे. भाड्याचे दुकान घेवून गेली चार वर्षापासून पत्नीसह सुनिलकुमार महातो फुलझाडे, फळ झाडे, त्याला लागणा-या विविध प्रकारच्या कुंड्या, फ्लॉवर पॉट, शोभेच्या वस्तू बरणी, माठ, मग, आदी वस्तू विक्री व्यवसाय करतात.सध्या ग्राहकही मंदावला आहे. यामुळे दिवसभरातून आठ ते दहा ग्राहकच दुकानाकडे फिरकत असल्याचे सुनिलकुमार सांगतात.यातच मार्च ते मे या कडक उन्हाळा सिझनसाठी आणलेला पिण्याच्या पाण्याचा माठही पडून आहे. त्यातही पन्नास हजाराचे भांडवल गुंतवले होते.

पिंपरी-चिंचवडकरांनो शास्तीकराबाबत महत्त्वाची बातमी; महापालिका आयुक्तांनी घेतला मोठा निर्णय

आता तोही किती काळ सांभाळावा लागणार असा प्रश्न आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून दुकान पुन्हा सुरू झाले खरे मात्र नेहमी सारखा ग्राहक येत नसल्याने विक्री होत नाही. तर जेमतेम येणारा ग्राहकही एरव्ही पन्नास ते साठ रूपयाला जाणारे गुलाबाचे छोटे रोपटे अर्ध्या किमतीवर मागणी करत आहेत. परिणामी यातून कसे उभे राहावे याची चिंता पडली असल्याचे सुनिलकुमार महातो यांनी सांगितले.

अन्‌ हरवलेले सोन्याचे ब्रेसलेट अखेर तिला मिळाले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown Flower Loss Seller