पिंपरी-चिंचवडकरांनो शास्तीकराबाबत महत्त्वाची बातमी; महापालिका आयुक्तांनी घेतला मोठा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जून 2020

पिंपरी-चिंचवड करांनो! तुम्ही अवैध बांधकामांवरील शास्ती (दंड) माफ होण्याची वाट पाहात असाल आणि त्या आशेवर थांबून मूळ मिळकतकराची रक्कम भरत नसाल, तर खूप मोठी चूक करीत आहात. कारण, शास्ती फामीचा निर्णय होईल की नाही हे माहीत नाही. याबाबत राज्य सरकार निर्णय घेईल. आणि शास्ती माफीचा निर्णय सरकारने घेतला तरी, तुम्हाला मिळकतकराची मूळ रक्कम भरावीच लागणार आहे. पण, ती त्या त्या आर्थिक वर्षात भरली तर, अन्यथा थकबाकी म्हणून अधिकची रक्कम भरावी लागणार आहे.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड करांनो! तुम्ही अवैध बांधकामांवरील शास्ती (दंड) माफ होण्याची वाट पाहात असाल आणि त्या आशेवर थांबून मूळ मिळकतकराची रक्कम भरत नसाल, तर खूप मोठी चूक करीत आहात. कारण, शास्ती फामीचा निर्णय होईल की नाही हे माहीत नाही. याबाबत राज्य सरकार निर्णय घेईल. आणि शास्ती माफीचा निर्णय सरकारने घेतला तरी, तुम्हाला मिळकतकराची मूळ रक्कम भरावीच लागणार आहे. पण, ती त्या त्या आर्थिक वर्षात भरली तर, अन्यथा थकबाकी म्हणून अधिकची रक्कम भरावी लागणार आहे. त्यामुळे शास्त्री माफीची वाट न पाहता मूळ मिळकतकराची रक्कम भरा आणि बिनधास्त राहा. महापालिकेने यासाठी आखलेल्या अभय योजनेला ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. त्याचा लाभ चर्या आणि मिळकतकराची मूळ रक्कम भरून टेन्शन मुक्त व्हा. महापालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयात तुम्हाला उद्यापासून मूळ मिळकतकर रक्कम भरता येणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव आणि लॉकडाउनमुळे सर्वसामान्य नागरिकांची अर्थिक स्थिती विस्कळीत झाली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडून मिळकतकर वसुली करताना शास्तीकर अथवा दंड आकारणी केली जाणार नाही. मूळ मिळकतकर भरण्याची सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.  

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिका हद्दीतील निवासी व बिगरनिवासी मिळकतधारकांकडून वार्षिक मिळकतकर वसुली केली जाते. सध्या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव व लॉकडाउन घोषित केल्यामुळे नागरिक व उद्योजकांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत एप्रिल व मे या दोन महिन्याच्या कालावधीत मिळकतकरापोटी भरणा कमी झाला आहे. शहरातील अनधिकृत बांधकाम करण्याऱ्या मिळकतधारकांना मिळकतकर व शास्तीकर लावलेला आहे. 

पावसाळा म्हटला, की पिंपरीकरांच्या अंगावर काटा उभा राहतो; काय आहेत त्या आठवणी...

महापालिका अधिनियमानुसार चार जानेवारी २००८ नंतर केलेल्या शहरातील अवैध बांधकामांना २०१२-१३ पासून शास्त्री कर आकारला जात आहे. ही रक्कम संबंधित मालमत्तेच्या मालमत्ता कराच्या दुप्पटी इतकी आहे. त्याचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे
* निवासी क्षेत्र एक हजार चौरस फूट असल्यास शास्ती माफ आहे (तत्कलीन फडणवीस सरकारचा निर्णय. मात्र तोपर्यंत शास्ती आकारणी केलेली आहे)
* १००१ते २००० चौरस फूटपर्यंत अवैध निवासी बांधकामांना ५० टक्के शास्ती
* २००० चौरस फुटांच्या पुढील निवासी, बिगर निवासी, औद्योगिक मिळकतींना मूळ कराच्या दुप्पट शास्ती आकारणी

जॉब गेल्यामुळे आयटीयन्सना चिंतारोगाची समस्या; किती टक्क्यांपर्यंत प्रमाण गेलंय पाहा... 

अशी आहे वस्तुस्थिती
सरसकट सर्वच अवैध बांधकामांचा शास्ती माफीबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे. हा निर्णय होईल, या अपेक्षेने अनेक मिळकतधारक मूळ कराचा भरणाही करीत नाहीत. त्यामुळे त्यांची मूळ कराची थकबाकी वाढत आहे.  

नागरिकांना आवाहन
शास्ती वजा करून मूळ रक्कम एकरकमी भरण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. भविष्यात शास्ती माफीचा निर्णय सरकारने घेतल्यास नागरिकांनी भरलेल्या रकमेच्या मूळ करात समायोजन करण्यात येईल, अशी पोच पावती नागरिकांना दिली जाणार आहे. 

काय आहे अभय योजना
थकबाकीसह सर्व मिळकतकराची एकरकमी शंभर टक्के रक्कम भरल्यास विलंब शुल्कात ९० टक्के सुटी दिली जाईल. ३० जून पर्यंत अभय योजनेचा लाभ घेता येईल. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

आयुक्तांचे आवाहन
नागरिकांनी दोन जून पासून महापालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयात रोख, धनादेश, डीडीद्वारे मिळकतकर भरणा करावा. महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन कर भरणा करता येईल. ३० जून पुर्वी एकरकमी मिळकतकर भरून सामान्य करातील सवलत योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे. 

दरम्यान, पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांकडून मिळकतकर वसुली करताना शास्ती अथवा दंड आकारला जावू नये, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्याकडे केली होती. पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांची शास्तीकरामधून पूर्ण मुक्तता व्हावी, अशी आमची मागणी आहे. त्याबाबत आम्ही राज्य सरकारकडे पाठपुरावा करीत आहे, अशी माहिती आमदार लांडगे यांनी दिली.

- अवैध बांधकामांवरील शास्ती (दंड) माफ होईल, या आशेने वाढतेय मूळ मिळकतकराची थकबाकी
- मूळ मिळकतकराची रक्कम भरण्याचे आयुक्तांचे आवाहन
- मिळकतकर भरण्यासाठी अभय योजनेला ३० जूनपर्यंत मुदतवाढ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pimpri Chinchwad municipal shastikar commissioner decision