esakal | लोणावळ्यात सेक्स रॅकेट चालविणाऱ्या एकास अटक, दोन मुलींची सुटका | Sex Racket
sakal

बोलून बातमी शोधा

Criminal Arrested
लोणावळ्यात सेक्स रॅकेट चालविणाऱ्या एकास अटक, दोन मुलींची सुटका

लोणावळ्यात सेक्स रॅकेट चालविणाऱ्या एकास अटक, दोन मुलींची सुटका

sakal_logo
By
प्रशांत पाटील

लोणावळा - लोणावळा परिसरात चालणाऱ्या  सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका दलालास अटक केली आहे. तर दोन मुलीची सुटका करण्यात आली आहे. जय उर्फ धनंजय कातवारू राजभर (वय- ३७, रा. नांगरगाव लोणावळा, मूळ- टिळक नगर, चेंबूर, मुंबई) असे अटक केल्याचे नाव आहे. संशयित धनंजय राजभर हा लोणावळा येथील एका महिलेसोबत हे रॅकेट चालवण्याचे काम करतो, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.

व्हॉट्सअपच्या माध्यमातून ग्राहकांना मुलीचे फोटो पाठवून दर ठरवून त्या मुलींना मोटारीतून लोणावळा परिसरातील ग्राहकांना पुरवले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

हेही वाचा: कोरोना लसीकरणाला गती देण्यासाठी ‘मिशन कवच कुंडल’

दहशतवाद विरोधी पथक पुणे ग्रामीण आणि लोणावळा ग्रामीण पोलीसांनी संयुक्त कारवाई केली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बनावट ग्राहकाद्वारे जय उर्फ धनंजय यांच्याशी व्हॉट्सअपवर संपर्क साधण्यात आला. त्याने व्हॉट्सअप वर वेश्याव्यवसायासाठी मुलींचे फोटो पाठवून दर ठरवल्यानंतर या मुलींना तो एके ठिकाणी घेऊन येतो, असे सांगितल्यानंतर पोलीसांनी त्याजागी सापळा रचला. मोटारीतून दोन मुली घेऊन तेथे आला. खात्री पटताच पथकाने आरोपीला ताब्यात घेतले. या दोन्ही मुली दिल्ली येथून वेश्या व्यवसायासाठी आणल्या होत्या. या मुलीची सुटका केली आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस तपास करत आहेत.

loading image
go to top