पिंपरी : मोशी कचरा डेपोत आढळलेला 'तो' मृतदेह पुरुषाचा

Moshi_Depot
Moshi_Depot

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोवर गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास आढळलेला मृतदेह पुरुषाचा असून, कुजलेला आहे. एमआयडीसी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह वायसीएम रुग्णालयाच्या आवारातील मरणोत्तर तपासणी केंद्रात (पीएम सेंटर) पाठवला आहे. मात्र, सदर मृतदेह कचरा डेपोत शहराच्या कोणत्या भागातील कचरावाहक गाडीतून आला, हे अद्याप समजू शकलेले नाही. याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागाने घरोघरचा कचरा संकलन करण्यासाठी 8 क्षेत्रीय कार्यालयनिहाय घंटागाड्या व कर्मचारी नियुक्त केले आहेत. काही ठिकाणी कचरा कुंड्या ठेवल्या आहेत. त्यातील कचरा काॅम्पक्टर वाहनातून उचलून मोशी डेपोत आणला जातो. अशाच एका काॅम्पक्टर वाहनातून गुरुवारी एका पुरुषाचा मृतदेह डेपोत आला. जेसीबी यंत्राद्वारे कचरा वर्गीकरण करून डंप करीत असताना मृतदेह आढळला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मृतदेह कोणत्या भागातील गाडीतून आला, हे अद्याप कळलेले नाही. पण, पंचनामा केला आहे. रात्र असल्याने मरणोत्तर तपासणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे मृत्यूचे कारण समजलेले नाही. ओळखही पटलेली की नाही. मृतदेह पुरुषाचा असून कुजलेला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी दिली. 

मृतदेह कोणत्या भागातील वाहनातून आला, याची चौकशी सुरू असल्याचे महापालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल राॅय व पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By : Krupadan Awale)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com