Maratha Reservation : जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधात भोसरी दिघी परिसरात शुकशुकाट

भोसरीतील आळंदी रस्ता, दिघी रस्ता, पीएमटी चौक, दिघीतील छत्रपती संभाजी महाराज चौक ते विठ्ठल मंदिर रस्ता, पुणे-आळंदी रस्ता आदी परिसरातील दुकाने पूर्णपणे बंद होती.
bhosari
bhosari sakal

भोसरी - मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी आणि जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधासाठी पुकारलेल्या बंदला भोसरी आणि दिघी परिसरातील उत्स्फूर्त तर इंद्रायणीनगरात समिश्र प्रतिसाद मिळाला.

सकाळी बंद केलेली दुकाने संध्याकाळी पाच वाजेपर्यंतही बंदच ठेवण्यात आल्याने परिसरात शुकशुकाट पसरला होता. सामाजिक संघटना आणि सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी परिसरात बाईक रॅली काढून बंदला पाठिंबा दर्शविला.

bhosari
Gadchiroli : विकासाचे तीन तेरा, श्रेयासाठी कलगीतुरा

भोसरीतील आळंदी रस्ता, दिघी रस्ता, पीएमटी चौक, दिघीतील छत्रपती संभाजी महाराज चौक ते विठ्ठल मंदिर रस्ता, पुणे-आळंदी रस्ता आदी परिसरातील दुकाने पूर्णपणे बंद होती. त्यामुळे नेहमीच ग्राहक आणि नागरिकांची गजबज असलेल्या रस्त्यांवर शुकशुकाट होता. तर इंद्रायणीनगरात बंदला समिश्र प्रतिसाद मिळाला.

bhosari
Fraud News : आईची बनावट सही करून मुलाने केली सदनिकेची परस्पर विक्री

सामाजिक संघटना आणि सर्व पक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बंदला पाठिंबा दर्शविण्यासाठी सकाळी अकरा वाजता पीएमटी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बाईक रॅलीला सुरवात केली.

bhosari
Pune News : बारामतीकरांनी अनुभवला दहीहंडीचा थरार...

ही बाईक रॅली आळंदी रस्ता, दिघी रस्ता, चांदणी चौक ते लांडेवाडी मार्गाने काढण्यात आली. लांडेवाडी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅली इंद्रायणीनगर, स्पाईन रस्ता, सद्गुरुनगर, चक्रपाणी वसाहत, पीएमटी चौक आदी मार्गाने काढण्यात आली. या वेळी एक मराठा लाख मराठा, जय जिजाऊ जय शिवराय, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाचा बापाचे....अशा घोषणा देण्यात आल्या. सुरू असलेल्या पीएमपी बसला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com